विषय शिक्षकांची 6 वर्षांपासून रखडलेली कार्यशाळा होणार तरी कधी?

0
58
गोंदिया, दि.०२::जिल्हा परिषद गोंदिया अंतर्गत उच्च प्राथमिक शाळांमध्ये मागील 6 वर्षांपासून विषय शिक्षकांची 150 पेक्षा अधिक पदे रिक्त आहेत त्यात विज्ञान गणित विषय शिक्षकांची 120 पेक्षा अधिक पदे रिक्त आहेत. ही पदे प्राथमिक शिक्षकांमधून पदोन्नतीने भरली जातात पण गोंदिया जिल्ह्यात पात्र पदवीधारक शिक्षक असून सुद्धा विषय शिक्षकांची पदे भरली जात नाही आहेत. विज्ञान गणित विषय शिक्षकांची कार्यशाळा घेण्याची प्रक्रिया जुलै 2020 पासून सुरू आहे, 2021 मध्ये पात्र शिक्षकांची अंतिम यादी सुद्धा प्रकाशित करण्यात आली व नंतर फेब्रुवारी 2022 मध्ये दोनदा पात्र  शिक्षकांना कार्यशाळेकरिता बोलावण्यात आले, दि 28 फेब्रुवारी 2022 ला कार्यशाळेच्या नियोजित वेळी नेमकी कार्यशाळा पुढे ढकलण्यात आल्याचे सांगण्यात आले व उपस्थित 80 शिक्षक आल्या पावली परत गेले. मार्च मध्ये कार्यशाळा होईल असं वाटत होतं पण जून उजाडला तरी कार्यशाळा घेण्यात आली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील हजारो शिक्षकांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.सण 2016 ला झालेल्या कार्यशाळे विरोधात काही शिक्षक कोर्टात गेलेले आहेत पण त्या कार्यशाळेचे या कार्यशाळेशी काहीच संबंध नाहीत तसेच जि आर मध्ये पदोन्नती करीता कोणते शिक्षक पात्र आहेत याचा स्पष्ट उल्लेख त्यामुळे ही कार्यशाळा त्वरित घेण्यास काहीच अडचण नाही.दि 13 ऑक्टोबर 2016 च्या विषय शिक्षक पदोन्नती बाबत स्पष्ट जि आर असतांना व याच जि आर नुसार अनेक जिल्हा परिषदेत विषय शिक्षकांच्या कार्यशाळा झाल्या असून गोंदिया जिल्हा परिषद प्रशासनास कोणती अडचण आहे हे समजायला मार्ग नाही. ही कार्यशाळा नवीन सत्र सुरू होण्यापूर्वी झाल्यास विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान टाळता येईल.