एक्युट पब्लिक शाळेने १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखली

0
23

गोंदिया,दि.17ः मागील अनेक वर्षापासून एक्युट पब्लिक शाळेचा निकाल सतत १०० टक्के लागत आहे. १०० टक्के निकालाची परंपरा कायम ठेवत उंच भरारी घेतली.मोनाली रहांगडाले या विद्यार्थिनीने ९४.४० टक्के गुण प्राप्त करून प्रथम क्रमांक प्राप्त केला.तर अपूर्व भास्कर या विद्यार्थीनीने ९०.६० टक्के गुण प्राप्त करून द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे.तसेच मनीष भोयर या विद्यार्थ्याने ८७.८० टक्के गुण प्राप्त करून तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे.तसेच हिमांशू नागपुरे या विद्यार्थ्याने ८७.२० टक्के गुण प्राप्त करून चतुर्थ क्रमांक प्राप्त केला आहे.आणि गुंजन चौरासिया या विद्यार्थीनीने ८६.२० टक्के गुण प्राप्त करून पाचवा क्रमांक प्राप्त केला आहे.

एक्युट पब्लिक शाळेचा शैक्षणिक दर्जा सातत्याने उंचावीत आहे. त्यामुळे विद्यार्थीही उंच भरारी घेऊन उच्च शिक्षणासाठी झेप घेत आहेत.विशेष म्हणजे या शाळेतून ९ विद्यार्थ्यांनी ८० टक्क्याहून अधिक गुण प्राप्त केले आहे. तर उर्वरित सर्व विद्यार्थ्यांनी सुद्धा प्राविण्य यादीत स्थान प्राप्त केले आहे.

विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय संस्थेचे अध्यक्ष श्रीमती गीताताई भास्कर,सचिव संजयकुमार भास्कर, सहसचिव श्रीमती शुभाताई शहारे तसेच शाळेचे प्राचार्य अमितकुमार,मुख्याध्यापिका श्रीमती उज्ज्वला पारधी,पर्यवेक्षक श्री प्रविणकुमार मेश्राम ,शिक्षक कुमारी ललिता कुथे,कुमारी रागिणी शाहू,कुमारी विद्या कोरे,श्रीमती माधुरी मेश्राम व सर्व शिक्षकगण आणि आई वडिलांना दिले आहे.सर्व यशस्वी विद्यार्थ्याना संज्योत बहुउद्देशिय शिक्षण संस्थेने उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.