Home शैक्षणिक अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना पहिलीपासून शिष्यवृत्ती लागू करावी; आमदार चंद्रिकापुरेना निवेदन

अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना पहिलीपासून शिष्यवृत्ती लागू करावी; आमदार चंद्रिकापुरेना निवेदन

0

अर्जुनी-मोरगाव : शिक्षण घेणे हा बालकाचा हक्क आहे. तसेच वयाच्या 14 वर्षापर्यंत प्रत्येक बालकाला मोफत शिक्षण मिळाले पाहिजे हा कायदा तयार करण्यात आला आहे. तरीही आजही अनेक विद्यार्थी अनेक अडचणीमुळे आपला प्राथमिक शिक्षण पूर्ण करू शकत नाही.

प्रत्येक बालक शिकला पाहिजे यासाठी अनेक प्रकारच्या शिष्यवृत्ती शासनामार्फत दिल्या जातात. ओबीसी विद्यार्थ्यांसाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती ही इयत्ता पहिलीपासून लागू आहे. एनटीच्या विद्यार्थ्यांना इयत्ता पहिलीपासून शिष्यवृत्ती लागू करण्यात आली आहे. अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती लागू करण्यात आली आहे. अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी अल्पसंख्यांक ही शिष्यवृत्ती मिळत आहे. अस्वच्छ व्यवसाय करणाऱ्या पालकांच्या मुलांसाठी अस्वच्छ व्यवसाय शिष्यवृत्ती लागू करण्यात आली आहे. तसेच मुलींसाठी सुद्धा अनेक प्रकारच्या शिष्यवृत्ती लागू आहेत.

परंतु अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना इयत्ता पहिलीपासून कोणतीही शिष्यवृत्ती मिळत नाही. अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना इयत्ता पहिलीपासून शिष्यवृत्ती मिळावी यासाठी अर्जुनी-मोरगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांना निवेदन देऊन इयत्ता पहिलीपासून शिष्यवृत्ती लागू करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. आमदारांसोबत शिष्यवृत्ती संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. आपली भेट सामाजिक न्याय मंत्री, शिक्षण मंत्री तसेच संबंधित विभागाचे सचिव यांच्याशी सुद्धा भेट करून देईल व मी सुद्धा या समस्येकडे जातीने लक्ष देईन, असे आमदार चंद्रिकापुरे यांनी आश्वासन दिले.याप्रसंगी पुनाराम जगझापे, नरेश गोंडाने, कुणाल मेश्राम, जितेंद्र साखरे व इतर मंडळी उपस्थित होते.

Exit mobile version