Home शैक्षणिक महाडीबीटी पोर्टल : शिष्यवृत्ती व योजनांचे अर्ज सादर करा

महाडीबीटी पोर्टल : शिष्यवृत्ती व योजनांचे अर्ज सादर करा

0

समाज कल्याण विभागाचे आवाहन

  वाशिम, दि. 13:  अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राबविण्यात येणाऱ्या मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती/शिक्षण फी, परीक्षा फी योजना व इतर ऑनलाईन योजनांचे शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मधील अर्ज स्विकारण्यासाठी २2 सप्टेंबर २०२२ पासून नवीन प्रवेशित व नूतनीकरण विद्यार्थ्यांचे अर्ज भरण्यासाठी महाडिबीटी पोर्टल कार्यान्वित करण्यात आले आहे.

        सन २०२२-२३ मधील अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती व इतर योजनांचे अर्ज https://mahadbtmahait.gov.in या महाडीबीटी पोर्टलच्या संकेतस्थळावर पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज भरुन घ्यावे.  महाडिबीटी प्रणालीवर भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती तसेच राज्य शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध शैक्षणिक योजनांची संख्या लक्षात घेता तसेच भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजनेबाबत केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालय व सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत समाज कल्याण आयुक्तालयास या अगोदरच सूचना देण्यात आल्या आहे. सन 2022-23 या शैक्षणिक वर्षात योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी होण्याच्या दृष्टीने नमुद केलेल्या वेळापत्रकानुसार नविन व नुतनीकरणाचे अर्ज शासन निर्णयानुसार पडताळणी करुन मंजूर करणे आवश्यक आहे.

         शैक्षणिकस्तर कनिष्ठ महाविद्यालयातील अभ्यासक्रम इयत्ता 11 वी व 12 वी सर्व शाखा, इयत्ता 11 वी व 12 वी एम.सी.व्ही.सी, आयटीआयसाठी नुतनीकरण करण्याचे अर्ज 15 ऑक्टोबरपर्यंत प्राप्त झालेले अर्ज संबंधित महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी ऑनलाईन सादर करावे. वरिष्ठ महाविद्यालयातील बिगर व्यावसायीक अभ्यासक्रम प्रथम, व्दितीय व तृतीय वर्ष सर्व शाखेचे नविन अर्ज 20 ऑक्टोबरपर्यंत तसेच नुतनीकरणाचे अर्ज 15 ऑक्टोबरपर्यंत प्राचार्यांनी ऑनलाईन सादर करावे. वरिष्ठ महाविद्यालयातील व्यावसायीक अभ्यासक्रम प्रथम, व्दितीय व तृतीय व अंतिम वर्ष अभियांत्रिकी, वैद्यकीय, व्यवस्थापन अभ्यासक्रम, फार्मसी व नर्सिंग इत्यादीसाठी नविन अर्ज 7 नोव्हेंबरपर्यंत तसेच नुतनीकरणाचे अर्ज 31 ऑक्टोबरपर्यंत प्राचार्यांनी ऑनलाईन सादर करावे.

           सर्व महाविद्यालयांनी आपल्यास्तरावरुन वरील वेळापत्रकानुसार कार्यवाही करावी. जेणेकरुन आयुक्तालयाकडून शिष्यवृत्तीची रक्कम विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रीया पुर्ण् करता येईल. जिल्हयातील सर्व महाविद्यालयातील प्राचार्यांनी आपल्यास्तरावरुन सर्व संबंधित पात्र विद्यार्थ्यांना महाडीबीटी पोर्टलवर अर्ज भरण्यास कळवावे. तसेच महाडीबीटी पोर्टल https:/dbtworkflow.mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर संबंधित महाविद्यालयांनी मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण फी, परीक्षा फी (फ्रीशिप) योजना व इतर ऑनलाईन झालेल्या सर्व योजनांच्या विद्यार्थ्यांचे अर्ज शासन निर्णयानुसार पडताळणी करून पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, वाशिम यांच्याकडे तात्काळ ऑनलाईन पाठवावे. असे आवाहन समाज कल्याणचे सहायक आयुक्त, मारोती वाठ यांनी केले आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version