आरटीई फाउंडेशनचे उपशिक्षणाधिकारी (प्राथ.) यांना निवेदन

0
26

गोंदिया : आरटीई फाउंडेशन जिल्हा गोंदिया कार्यकारिणी द्वारे उप शिक्षणाधिकारी जी.प.गोंदिया यांना खाजगी संस्थांना असलेल्या समस्यांचे निराकरण करण्याबद्दल चे स्मरणपत्र देण्यात आले. शिक्षण विभागाकडून खाजगी संस्था संचालकांचा खेळ मांडल्याचे दृश्य दिसून येत आहे हा खेळ ताबडतोब थांबवून खाजगी संस्था संचालकांची मदद शिक्षण विभागाने करावी व २०१२-१३ पासून प्रलंबित असलेली आरटीई चि प्रतिपूर्ति त्वरित संस्थांना देण्यात यावी. या पूर्वी दोन वेळा शिक्षणाधिकारी तसेच जी. प. अध्यक्ष यांना आरटीई फाउंडेशन जिल्हा गोंदिया यांच्याकडून निवेदन देण्यात आले आहे.
सत्र २०२२-२३ मध्ये उपरोक्त प्रतिपूर्ति शाळांना देण्यात आली नाही तर गोंदिया जिल्ह्यातील संपुर्ण खाजगी संस्था संचालकांना कडून सत्र २०२३-२४ चे आरटीई प्रवेश घेतले जाणार नाही असे निवेदन देण्यात आले. तसेच जुन्या शाळेतून टीसी न घेऊन जाता दुसर्‍या शाळेत कसे प्रवेश दिले जाते. व गट साधन केंद्र यांच्याकडून त्यांना कसे ऑनलाइन अप्रूवल दिले जाते. याचे समाधानकारक मार्ग कसे काढता येईल यावर शिक्षणाधिकारी यांनी विचार करावा. त्याचप्रमाणे मा. शिक्षणाधिकारी यांनी पालकांकरिता टीसी काढण्याची एक ठराविक कालावधी निश्चित करून जुन्या शाळेची शिल्लक असलेली शुल्क जमा केल्यानंतर टीसी पालकांना देण्यात यावी, अशी मागणी आरटीई फाऊंडेशन जिल्हा गोंदिया कार्यकारिणीद्वारे करण्यात आली. प्रतिवेदन देते वेळी आरटीई फाउंडेशनचे जिल्हा अध्यक्ष प्रा.आर.डी.कटरे, सतीश बन्सोड, पंकज सराफ, विलास नागदेवे, डॉ. सुजीत टेटे, वाय.टी.कटरे, संतोष राऊत, शिवेंद्र येळे, हिमांशू बिसेन, स्वप्निल पारधी, भुवन बिसेन, खलील खान पठाण, मेघा बिसेन, प्रकाश पंचभाई, नरेश शहारे, राजेन्द्र सोनवाणे आदि उपस्थित होते.