Home शैक्षणिक मोबाईलकडून पुस्तकांकडे जाऊया – सीईओ पाटील

मोबाईलकडून पुस्तकांकडे जाऊया – सीईओ पाटील

0

गोंदिया,-मोबाईलचा वापर मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे वाचन कमी होत आहे. ग्रंथालयाचे सभासद होऊन, पुस्तकांशी नातं जोडून वाचन चळवळ गतिमान करूया आणि मोबाईलकडून पुस्तकांकडे जाऊया, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील यांनी केले.गोंदिया जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाद्वारे आयोजित ‘संवाद गुणवत्तेचा’ या माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांच्या कार्यशाळेमध्ये ते उद्घाटक म्हणून बोलत होते.कार्यशाळेची सुरुवात विद्यार्थ्यांना ग्रंथालयाचे वर्गणीदार करून त्यांना पाटील यांचे हस्ते पुस्तकांचे वाटप करून करण्यात आली. यावेळी पाटील यांनी दप्तर मुक्त शाळा, चला संविधान समजून घेऊ या आणि वाचन वाढवून
स्पर्धा परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांनी चांगले यश मिळविण्यासाठी सर्वांनी नियोजनबद्ध प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली. जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांनी सर्व मुख्याध्यापकांना विशेष संदेश पाठवून या कार्यशाळेसाठी शुभेच्छा दिल्या.त्यांच्या संदेशाचे वाचन शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी केले तेव्हा सर्व मुख्याध्यापकांनी टाळ्या वाजवून
जिल्हाधिकारी यांना धन्यवाद दिले. कार्यशाळेचे प्रास्ताविक व संचालन माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी केले.यावेळी जिल्हा ग्रंथालय अधिकारी अस्मिता मडापे यांनीही ग्रंथालयाचे वर्गणीदार वाढवून गोंदिया जिल्ह्यामध्ये उत्तम काम करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले.परिवहन विभागाच्या अधिकारी डोंगरवार यांनी परिवहन समिती, रस्ता सुरक्षा अभियान याबाबत मुख्याध्यापकांची भूमिका विषयी मार्गदर्शन केले.प्रा. सविता बेदरकर यांनी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा व मुख्याध्यापकांची भूमिका याबाबत माहिती सांगितली. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य रुद्रकार यांनी नियोजनबद्ध उपक्रम राबवून शैक्षणिक गुणवत्ता कशी वाढवावी यावर मार्गदर्शन केले. जिल्हा नियोजन अधिकारी पाचखेडे यांनी मानव विकास अंतर्गत सुरू असलेल्या विविध शालेय योजनांबाबत
माहिती दिली. कार्यशाळेमध्ये गुणवत्ता विषयक विविध घटकांची सविस्तरपणे चर्चा करून मार्गदर्शन करण्यात आले. कार्यशाळेसाठी जिल्ह्यातील आठही पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी,मुख्याध्यापक, प्राचार्य उपस्थित होते.

error: Content is protected !!
Exit mobile version