Home शैक्षणिक भर्रेगांव ग्रामपंचायत प्रथमच अंगणवाडीच्या बालकांना गणवेश वाटप

भर्रेगांव ग्रामपंचायत प्रथमच अंगणवाडीच्या बालकांना गणवेश वाटप

0

चिचगड-देवरी तालुक्यातील भर्रेगांव ग्रामपंचायत अंतर्गत अंगणवाडीतील बालकांना गणवेश वाटप करण्यात आले. हा उपक्रम ग्रामपंचायत मध्ये पहिल्यांदाच राबवण्यात आला आहे.भर्रेगांव ग्रामपंचायत प्रथमच अंगणवाडी बालकांना गणवेश वाटप ग्राम पंचायत गावाच्या विकासबरोबर गावतील बालकांचा विकास व्हावा यादृष्टीने मोलाचे उपक्रम घेऊन आले. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. मात्र, आदिवासी क्षेत्रामध्ये आर्थिक परिस्थितीमुळे अशा सुविधा मिळण्याची शक्यता सहसा नसतेच. याच हेतूने ग्राम पंचायत भर्रेगांव येथे हा उपक्रम राबवण्यात आला.

ग्रामपंचायत सचिव सरपंच आणि सदस्य मिळून अंगणवाडी सेविका यांच्याशी चर्चा करुन ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या सर्व अंगणवाडीतील बालकांना गणवेश देण्याचा निर्णय घेतला.याप्रसंगी कार्यक्रमात बाल विकास अधिकारी एस एस वरपे उपस्थित झाले होते. त्यांच्या हस्ते चिमुकल्यांना गणवेश वितरण करण्यात आले. बाल विकास अधिकारी यांनी ग्रामपंचायतीचे कौतुक केले. तसेच अंगणवाडीतील बालकांकरता गणवेशाची तरतूद केल्याचे प्रतिपादन केले. या साहित्यामुळे निश्चितच बालकांचा उत्साह वाढेल. तसेच वाटप करण्यात आलेले गणवेशामुळे अंगणवाडीत सुश्रुतता येण्यास मदत होणार असल्याचे सांगितले.या कार्यक्रमात ग्रामपंचायत सरपंच लखनलाल पंधरे , सचिव सि आर चाचेरे , उपसरपंच जयेंद्र मेंडे , सदस्य योगराज साखरे , नंदलाल नेताम, विद्याताई खोटेले, रिताताई सलामे, संगीताताई दर्रो, मुन्नीताई उसेंडी, पवित्राताई दर्रो, परिचर मोहन कोचे, प्रमोद मडावी, ऑपरेटर रेवचन खोटेले, रोजगार सेवक नेताम अंगणवाडी सेविका सरिताताई रहिले, फेकनताई कोचे, शारदा मेश्राम, मेश्राम,डोये उपस्थित होते.

error: Content is protected !!
Exit mobile version