Home शैक्षणिक व्यायाम व खेळाच्या माध्यमातून आरोग्य व आत्मविश्वास वाढेल- जिल्हा परिषद सदस्य डॉ....

व्यायाम व खेळाच्या माध्यमातून आरोग्य व आत्मविश्वास वाढेल- जिल्हा परिषद सदस्य डॉ. लक्ष्मण भगत

0

गोरेगांव:- आजच्या आधुनिक स्पर्धात्मक जगात मुलांनी मोबाईलच्या पूर्णतः आहारी न जाता अभ्यास व्यायाम आणि खेळाच्या सवयी लावून घेतल्यास चांगले आरोग्य लाभून आत्मविश्वास दृढ होईल आणि आपल्या गावाचे व शाळेचे नाव मोठे करावे असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य डॉ.लक्ष्मण भगत यांनी केले .
जिल्हा परिषद आदर्श व प्राथमिक शाळा घुमर्रा येथे सोमवारी 24 जानेवारी सकाळी 10.00 वाजता वार्षिक स्नेहसंमेलन उद्घाटनला सुरुवात झाली स्नेहसंमेलन सोहळा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष ऍड. कृष्णकुमार शेंडे यांच्या अध्यक्षते खाली संपन्न झाले.
मुलांच्या सर्वांगीण विकासात त्यांच्या अवती-भोवतीच्या असंख्य बाबींचा समावेश असतो त्यात काही अंशी जसा शाळांचा सहभाग असतो तसाच कुटुंबाचाही सहभाग असतो केवळ शालेय संस्कारावर मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा ही अपेक्षा करणे तितकेसे बरोबर नाही मुलांच्या जडणघडणीत शालेय संस्कारा इतकेच कौटुंबिक संस्कार ही महत्त्वाचे आहे. अपेक्षा, कल्पना, आवडी- निवडी, अडचणी यावर कुटुंबात चर्चा होत नाही याउलट या वयात ज्या गोष्टी आपल्याला करता आल्या नाहीत त्या मुलांकडून करून घेण्याचा प्रयत्न करा. मुलांच्या प्रश्नांना उत्तर देत नाही, त्यामुळे मुलांची वाढ खुंटते. कुटुंबांचे संवाद विश्वासाचे वातावरण मुलांना आव्हाने पेलविण्याचे बळ देते त्यामुळे कुटुंबाचे संस्कार महत्त्वाचे ठरते असे
माजी जिल्हा परिषद अध्यक्ष ऍड. कृष्णकुमार शेंडे यावेळी म्हणाले.यावेळी व्यासपीठावर उद्घाटक जि.प.सदस्य शशीभाऊ भगत, दीपप्रज्वलक जि.प.सदस्य डॉ.लक्ष्मण भगत,पं.स.सदस्य शशीकला ताराम,रंगमंचपुजक सरपंच ग्रा.पं.घुमर्रा सविता फुंडे,प्रमुख अतिथी तं.मु.स.अध्यक्ष दुर्जन पटले,ग्रा.पं.सदस्य रामदास चौधरी,आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले.मान्यवरांचे स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापक गोपाल बिसेन यांनी केले .

error: Content is protected !!
Exit mobile version