Home शैक्षणिक जि प प्रा शाळा बुधेवाडा येथे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

जि प प्रा शाळा बुधेवाडा येथे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

0

अर्जुनी मोरगाव,दि.31ः तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बुधेवाडा येथे एकदिवसीय वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमास उदघाटक म्हणून जिल्हा परिषद सदस्या सौ ‌.पोर्णिमा ढेंगे उपस्थित होत्या,तर या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून पंचायत समिती सदस्या सौ.भाग्यश्री सयाम उपस्थित होत्या.प्रमुख पाहुणे म्हणून ग्राम पंचायत बुधेवाडाच्या सरपंच सौ.रोशनी कोराम,उपसरपंच राधेश्याम राऊत,ग्रामपंचायत सदस्य रतन कुरसुंगे,यादव सोनवाणे,सौ. पूनम राऊत,सौ.शारदा कोराम,वैशाली ईस्वार,चित्रलेखा मेश्राम तसेच माजी सरपंच गणपती राऊत,शोभा लंजे,संगिता लाडे,कुमुद सोनवाणे उपस्थित होते.तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पुरुषोत्तम चुलपार, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य उमेश सुर्यवंशी, पांडुरंग मेश्राम,निलेश्वर औरासे,अस्पाल भानारकर,शोभा मेश्राम,सरिता भोवते,सुषमा पचारे,कल्पना राणे,संगिता औरासे हे उपस्थित होते.तसेच नीलकंठ लंजे तंटामुक्त समितीचे अध्यक्ष,दुधराम लंजे सेवानिवृत्त शिक्षक,रवि कोराम,दुधराम औरासे शिक्षक मांडोखाल टोला,लुमेश्वर कोराम,श्रीकांत सांगोळे आदी मान्यवर उपस्थित होते.सदर कार्यक्रमात देशभक्तीपर गीतांवर आधारित गीतांवर नृत्य तसेच लावण्या, विविध प्रादेशिक गीतांवर नृत्य, अनेक सामाजिक प्रश्नांवर आधारित गीतांवर नृत्य, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित गीतांवर नृत्य इयत्ता पहिली ते चौथी च्या विद्यार्थ्यांनी सादर केले. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक एम.एस.लोणारे यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शाळेचे सहायक शिक्षक विक्रमसिंह ठाकूर यांनी केले.

error: Content is protected !!
Exit mobile version