शैक्षणिक गुणवत्ता व दर्जात्मक शिक्षण मिळावे म्हणून नेहमी प्रयत्नशील राहू : जि.प.सदस्या अश्विनी पटले

0
17

गोंदिया,दि.11ः गोंदिया पंचायत समिति अंतर्गत येत असलेल्या दांडेगाव केंद्रात येणाऱ्या शाळेंचे दांडेगाव येथील अध्यापक विद्यालयात शिक्षण परिषद व शैक्षणिक गुणवत्ता आढावा सभेचे आयोजन करण्यात आले होते. आढावा सभेला संबोधित करतांनी जिल्हा परिषद सदस्या अश्विनी रविकुमार पटले यांनी क्षेत्रातील सर्व शाळा भौतिक सुविधा परिपूर्ण करण्यास प्रयत्नशील राहू असे मत व्यक्त केले.सर्व सुविधायुक्त शाळा करण्याकरीता लोक प्रतिनिधिंना एकत्र यावं लागेल तसेच शैक्षणिक गुणवत्ता व दर्जात्मक शिक्षण मिळावं म्हणून नेहमी प्रयत्नशील असणारे केंद्रप्रमुख,मुख्याध्यापक व सर्व शिक्षक यांनी केलेल्या परिश्रमाची पावती म्हणून आमची शाळा आदर्श शाळा या स्पर्धेत तालुक्यातील पहिल्या पाच शाळांमध्ये केंद्रातील दोन शाळांना मान मिळविता आले.जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा दांडेगाव मुली व जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सहेसपुर या दोन शाळा आलेल्या आहेत. केंद्राच्या सर्व शाळा अधिक परिश्रम करून गुणवत्तेत समोर राहतील अशी सर्वांकडून अपेक्षा केली.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्याअश्विनी रविकुमार पटले तसेच प्रमुख अतिथी म्हणून एकोडी पंचायत समिती क्षेत्राचे सदस्य, गंगाझरी पंचायत समिती क्षेत्राचे सदस्या वंदना प्रकाश पटले,माजी पंचायत समिति सदस्य प्रकाश पटले, एन.जी.डहाके केंद्रप्रमुख दांडेगाव , दांडेगावचे सरपंच पंकज अंबुले,धामणेवाडा सरपंच हिरामण मसराम,माजी सरपंच रविकुमार (बंटी) पटले, सहेसपूर उपसरपंच कनहैय्यालाल जिंदाकुरे,दांडेगाव उपसरपंच पुष्पा नेवारे, जांभूळकर केंद्राध्यक्ष ,नागपुरे उच्च श्रेणी मुख्याध्यापक,भगत उच्च श्रेणी मुख्याध्यापक, ग्राम पंचायत सदस्य तीजेस पटले,विद्यासागर सोनेवाने,शाळा व्यवस्थपन समितीचे अध्यक्ष भोजराज काळसर्पे दांडेगाव,इस्राईल पठाण दांडेगाव,भुवन पेशने एकोडी, ब्रम्हराज बबरिया गंगाझारी ,दुर्गा शहारे पैकाटोला दांडेगाव,चंद्रसिंग टेकाम जूनेवाणी गंगाझरी,हेमलता टेंभरे,प्रल्हाद डोंगरे, किशोर लिल्हारे,सुरेश बोपचे,तमेश्र्वरी बिसेन,शालू,वडीचार,अश्विनी,बावनकर,दुर्गा जिंदाकुरे,वनिता कोल्हारे,दुर्गा नागपुरे,आशा बागडे,आशा आगाशे,मंगला गठणकार,सुकवांता मरस्कोल्हे,मंगला भोंडे,आशा पारधी,कविता कटरे,कविता मोहरे,उर्मिला शहारे,ममता मडावी,छंनु चौधरी,लक्ष्मी नेवारे,तसेच केंद्रातील सर्व ग्रामपंचायतचे सदस्यगण,शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व अध्यक्ष उपाध्यक्ष व सर्व सदस्य गण, सर्व शाळेतील मुख्याध्यापक व सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते.