Home शैक्षणिक भंडारा-गोंदियाच्या वैद्यकीय महाविद्यालयांचा प्रश्न सुटणार  

भंडारा-गोंदियाच्या वैद्यकीय महाविद्यालयांचा प्रश्न सुटणार  

0

गोंदिया-भंडारा व गोंदिया जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय सुरू होऊन, त्या माध्यमातून डॉक्टर घडावेत आणि रुग्णांना चांगलीसेवा मिळावी, म्हणून खा. सुनील मेंढे यांचा सातत्याने प्रयत्न सुरू असून संसदेत हा विषय मांडला. गोंदिया येथील वैद्यकीय महाविद्यालयात विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रवेश दिला जात असला तरी संथ गतीने सुरू असलेले निर्माण कार्य चिंतेचा विषय आहे. सर्व सुविधांनी युक्त वैद्यकीय महाविद्यालय जिल्ह्याच्या सेवेत कधी येणार, असा प्रश्न खासदारांनी खा.सुनिल मेंढे यांनी  विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देतांना केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडवीय म्हणाले की, गोंदिया येथीलवैद्यकीय महाविद्यालयाला पहिल्या टप्प्यात मंजुरी देण्यात आली असून महाविद्यालय निर्माणासाठी भू-संपादनाच्या कामाला तांत्रिकअडचणीमुळे उशीर झाला. त्यामुळे महाविद्यालयाच्या बांधकामास दिरंगाई होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यादरम्यान आरोग्य आणि कुटुंबकल्याण विभागाच्या केंद्रीय राज्य मंत्री भारतीताई पवार यांनी प्रस्तावित जागेला भेट सुद्धा दिलेली होती. सध्या प्रस्तावित जागेवर संरक्षणभिंतीचे बांधकाम पूर्ण झाले असून मुंबईला तातडीची बैठक लावून उर्वरीत काम लवकरच पूर्ण होईल. त्यासाठी लागणारा निधी राज्यशासनालाकेंद्राकडून पाठविण्यात आला आहे.भंडारा जिल्ह्यासाठी तिसर्‍या टप्प्यात वैद्वैयकीय महाविद्यालयाची घोषणा करण्यात आली. या संबंधी बोलतांना खा.मेंढेम्हणाले की, वैद्यकीय महाविद्यालयासाठी आवश्यक असलेले मापदंड पूर्ण करण्याची क्षमता भंडारा जिल्ह्यात आहे. करिता लवकरात लवकरजनतेच्या सेवेसाठी वैद्यकीय महाविद्यालय होणे गरजेचे आहे. यावेळी उत्तर देतांना केंद्रीय आरोग्य मंत्री म्हणाले की, वैद्यकीयमहाविद्यालयाचा डीपीआर राज्यशासनाने तयार करून केंद्राकडे पाठविल्यास त्याला त्वरित मंजुरी देण्यासाठी कार्यवाही करणार असल्याचेसांगितले.

Exit mobile version