Home शैक्षणिक पिएमश्री योजने अंतर्गत गोंदिया जिल्ह्यातील १९ शाळांचा समावेश

पिएमश्री योजने अंतर्गत गोंदिया जिल्ह्यातील १९ शाळांचा समावेश

0

#गोंदिया जिल्हापरिषद मार्फत राज्य प्रकल्प संचालकाना शाळांची यादी सादर

#प्रत्येक शाळेसाठी १ कोटी ८८ लक्ष रुपयांची ५ वर्षांकरिता तरतूद

#जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज रहांगडाले यांची माहिती

गोंदिया : नुकताच राज्यातील ८४६ शाळांचा सर्वांगीण विकास करणाऱ्या पीएमश्री योजनेची अंमलबजावणी करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.देशभरात पहिल्या टप्प्यात १५ हजाराहून अधिक शाळा उच्च दर्जाचे गुणात्मक शिक्षण देणाऱ्या सर्वोत्कृष्ट शाळा म्हणून विकसित करण्यात येणार असून यात राज्यातील ८४६ शाळांचा समावेश करण्यात येणार आहे. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात गोंदिया जिल्ह्यातील पात्र १९ शाळांचा समावेश करण्यात आलेला आहे.सदर योजने करिता शाळेचा सर्वांगीण विकास करणे साठी १ कोटी ८८ लक्ष रुपयांचा निधी ५ वर्षात खर्च करण्यात येईल अशी माहिती गोंदिया जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पंकज रहांगडाले यांनी दिली.

यात आमगाव तालुक्यातील जि.प. उच्च प्राथमिक शाळा करंजी, जि.प. उच्च प्राथमिक शाळा तिगाव, अर्जुनी मोरगांव तालुक्यातील जि.प. उच्च प्राथमिक शाळा झाशीनगर, जि.प. उच्च प्राथमिक शाळा निमगाव, जि.प. प्राथमिक शाळा अर्जुनी मोरगाव, देवरी तालुक्यातील जि.प. उच्च प्राथमिक शाळा पुराडा, जि.प. प्राथमिक शाळा भागी, जि.प. प्राथमिक शाळा देवरी, गोंदिया तालुक्यातील जि.प. भारतीय विद्यालय एकोडी, जि.प. उच्च प्राथमिक शाळा रतनारा, मनोहर म्युन्सिपल उच्च शाळा, गोरेगाव तालुक्यातील जि.प. उच्च प्राथमिक शाळा मुंडीपार, जि.प. उच्च प्राथमिक शाळा तुमखेडा, सडक अर्जुनी तालुक्यातील जि.प. उच्च प्राथमिक शाळा डव्वा, जि.प. उच्च प्राथमिक शाळा खडीपार, सालेकसा तालुक्यातील जि.प. उच्च प्राथमिक शाळा झालिया, जि.प. हिंदी उच्च प्राथमिक शाळा विचारपूर, तिरोडा तालुक्यातील जि.प. उच्च प्राथमिक शाळा कवलेवाडा, जि.प. उच्च प्राथमिक शाळा कोडेलोहारा या शाळांचा समवेश आहे.

मंत्रालय स्तरावर पाठपुरावा करणार : पंकज रहांगडाले

पिएमश्री योजने अंतर्गत गोंदिया जिल्ह्यातील पात्र शाळांची यादी मुंबई येथे जिल्हा परिषदेच्या मार्फत पाठवण्यात आली असून मंत्रालय स्तरावर पाठपुरावा करणार असल्याचे गोंदिया जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पंकज रहांगडाले यांनी सांगितले तसेच गोंदिया जिल्हा हा मागासलेला जिल्हा असून फक्त १९ शाळांची निवड करण्यात आली असल्याने इष्टांक वाढवण्याची विनंती राज्याचे उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना करणार असल्याची माहिती पंकज रहांगडाले यांनी दिली.

Exit mobile version