Home शैक्षणिक एमबीए, एमएमएस सामाईक प्रवेश परीक्षेची ऑनलाईन नोंदणी सुरू

एमबीए, एमएमएस सामाईक प्रवेश परीक्षेची ऑनलाईन नोंदणी सुरू

0

मुंबई, दि. 23 : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत तंत्रशिक्षण विभागांतर्गत  एमबीए, एमएमएस या सामाईक प्रवेश परीक्षेची ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया दि. २३ फेब्रुवारी २०२३ पासून सुरू होणार आहे. ही नोंदणी प्रक्रिया दि. ४ मार्च २०२३ पर्यंत सुरू राहणार आहे.

शैक्षणिक वर्ष २०२३-२४ करिता घेण्यात येणाऱ्या एमबीए/एमएमएस या व्यावसायिक पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी महा- एमबीए/एमएमएस सीईटी २०२३ ही परीक्षा दिनांक १८ मार्च २०२३ व १९ मार्च २०२३ रोजी घेण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी  https://mbacet2023.mahacet.org या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Exit mobile version