फेब्रुवारीत प्रभारी बीईओंने आमगावात केल्या 15 शिक्षकांच्या प्रतिनियुक्त्या?

0
58

गोंदिया,दि.27ः आमगाव पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या गटशिक्षणाधिकारी कार्यालयाने विद्ममान गटशिक्षणाधिकारी कुसूम पुसाम यांच्या रुजू होण्यापुर्वीच एैन परिक्षेचा हंगाम सुरु होण्याची वेळ असतांना 10-15 प्राथमिक शिक्षकांना इतर शाळेत प्रतिनियुक्तीच्या नावावर हलवल्याचे प्रकरण समोर आले आहे.वास्तविक मार्च महिन्यापासूनच जिल्हा परिषद शाळांतील परिक्षेच्या तयारीला सुरवात होत असतानाच आणि आधिच ज्या शाळेतून या शिक्षकांना इतर शाळेत हलविण्यात आले,त्या शाळेत सदर शिक्षक गेल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान व्हायला सुरवात झाली आहे.त्यामुळे या शिक्षकांनी प्रतिनियुक्तीकरीता कुठल्या नेत्याकडे पाठपुरावा केला होता का याचाही तपास करण्याची वेळ आली आहे.सोबतच फेबुवारी महिन्यात प्रतिनियुक्तीच्या नावावर हलविण्यात आलेल्या शिक्षकांना परत त्याच शाळेत पाठविण्यात यावे असा सुर येऊ लागला आहे.या प्रतिनियुक्ती संदर्भात आमगाव पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी श्रीमती कुसूम पुसाम यांना विचारणा केली असता त्यांनी आपण रुजू होण्याआधीच असा प्रकार घडला असल्याचे आपल्या लक्षात आल्याचे सांगितले.तसेच त्या प्रतिनियुक्त्या रद्द करुन पुर्वीच्याच शाळेत पाठविण्यासंदर्भात कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले.तर जिल्हा परिषद प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी डाॅ.महेंद्र गजभिये यांना विचारणा केल्यावर फेबुवारी महिन्यात प्रतिनियुक्ती झाल्याचे एैकून चौकशी करण्यात येईल असे सांगितले.त्यामुळे श्रीमती पुसाम यांच्या पुर्वी ज्यांच्याकडे गटशिक्षणाधिकारी पदाचा प्रभार होता,त्यांची सखोल चौकशी याप्रकरणातच नव्हे तर त्यांच्या कार्यकाळातील इतर प्रकरणाचीही करण्याची गरज झाली आहे.