Home शैक्षणिक जि.प.शाळांच्या गुणवत्ता वाढीसाठी आमची शाळा आदर्श शाळा उपक्रम प्रेरणादायी- सीईओ शितल पुंड 

जि.प.शाळांच्या गुणवत्ता वाढीसाठी आमची शाळा आदर्श शाळा उपक्रम प्रेरणादायी- सीईओ शितल पुंड 

0

गोंदिया,दि.15ः– अदानी फाउंडेशन तिरोडा व जिल्हा परिषद गोंदियाच्या प्राथमिक शिक्षणाच्या संयुक्त वतीने जिल्हा परिषदेच्या शाळांकरिता राबविण्यात येणारा आमची शाळा, आदर्श शाळा हा स्पर्धात्मक उपक्रम प्रेरणादायी आहे.या उपक्रमाच्या माध्यमातून व लोकसहभागातून जि.प.शाळांचा कायापालट होत असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती शितल पुंड यांनी केले.त्या अदानी फाउंडेशन द्वारा आयोजित आमची शाळा आदर्श शाळा उपक्रमाच्या बक्षीस वितरण सोहळ्यात होत्या.
याप्रसंगी शिक्षणाधिकारी डॉ. महेंद्र गजभिये,डायटचे प्रा.डॉ.नरेश वैद्य,समग्र शिक्षा अभियानचे जिल्हा व्यवस्थापक बाळकृष्ण बिसेन,अदानी फाउंडेशनचे प्रमुख बिमुल पटेल उपस्थित होते. प्रास्ताविकात बिमुल पटेल यांनी जिल्ह्याच्या शैक्षणिक विकासासाठी अदानी फाउंडेशन सदैव तत्पर असून विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीकरीता हवे असलेल्या सर्व सहकार्याची भूमिका कायम राहील असे त्यांनी सांगितले. शिक्षणाधिकारी डॉ.महेंद्र गजभिये यांनी आमची शाळा आदर्श शाळा या उपक्रमाची प्रशंसा करताना या उपक्रमाच्या माध्यमातून जि प च्या शाळांमध्ये गुणवत्ता वाढ व भौतिक विकास लोकसहभागातून होत असल्याचे बोलत विजेत्या शाळांचे अभिनंदन केले.तसेच डॉ. नरेश वैद्य यांनी स्पर्धेच्या मूल्यांकनाविषयी माहिती दिली.
आमची शाळा आदर्श शाळा 2022- 23 या वर्षाचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार गोंदिया तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा खर्रा ने पटकावला.तर सालेकसा तालुक्यातील जि.प.उच्च प्राथमिक शाळा बोदलबोडी िव्द्तीय आणि तृतीय क्रमांक गोरेगाव तालुक्यातील जि.प.उच्च प्राथमिक शाळा हिरडामालीने पटकाविला. जिल्हास्तरीय विजेता तीनही शाळांना अदानी फाउंडेशन तर्फे अनुक्रमे 1 लाख 21 हजार व स्मृतिचिन्ह, 75 हजार व स्मृतिचिन्ह, 51 हजार व स्मृतिचिन्ह देऊन अनुक्रमे गौरविण्यात आले.
तर अर्जुनी मोरगाव तालुकास्तरावर प्रथम जि.प.उच्च प्राथमिक शाळा मोरगाव तर द्वितीय उच्च प्राथमिक शाळा माहूरकूडा.आमगाव तालुका प्रथम जि.प.उच्च प्राथमिक शाळा करंजी तर द्वितीय जि.प. उच्च प्राथमिक शाळा शिवनी, देवरी तालुका प्रथम जि.प. उच्च प्राथमिक शाळा डवकी तर द्वितीय जि.प. उच्च प्राथमिक शाळा घोणाडी, गोंदिया तालुक्यातून प्रथम जि.प. उच्च प्राथमिक शाळा खर्रा तर द्वितीय जि.प. उच्च प्राथमिक शाळा रापेवाडा, गोरेगाव तालुक्यातून प्रथम जि.प. उच्च प्राथमिक शाळा हिरडामाली तर द्वितीय क्रमांक जि.प. उच्च प्राथमिक शाळा सटवा, सालेकसा तालुक्यातून जि.प. उच्च प्राथमिक शाळा बोदलबोडी तर द्वितीय जि.प. उच्च प्राथमिक शाळा झालिया, सडक अर्जुनी तालुक्यातून प्रथम जि.प. उच्च प्राथमिक शाळा पळसगाव तर द्वितीय जि.प. उच्च प्राथमिक शाळा घोटी, तिरोडा तालुक्यातून प्रथम जि.प. उच्च प्राथमिक शाळा खैरलांजी तर द्वितीय जि.प. उच्च प्राथमिक शाळा चिखली यांनी पटकावला वरील प्रथम व द्वितीय क्रमांक पटकाविणाऱ्या शाळांना अदानी फाउंडेशन तर्फे प्रत्येकी रोख 45 हजार रुपये व स्मृतिचिन्ह तसेच 30 हजार रुपये व स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले तसेच उत्कृष्ट गटशिक्षणाधिकारी म्हणून सालेकसा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी विशाल डोंगरे, गोंदिया पंचायत समितीचे जनार्दन राऊत व गोरेगाव पंचायत समितीचे निलकंठ शिरसाटे यांना स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले.उत्कृष्ट केंद्रप्रमुख म्हणून एस.एम.भैसारे,बी.एन.बोरकर,सौ.निशा बोदले,गुलाब भुसारी,एस.जी.कश्यप,एन.एस.लंजे,एस.एम.पडोळे, के.आर.गोटेफोडेे,यु.एम.बोपचे,एन.सी.बीजेवार,के.आर.वासनिक,बी.के.चांदेकर,धनराज पटले,विजेंद्र सिंग राठोड, तेजलाल भगत,यु.पी.बिसेन आदींना स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.संचालन व आभार प्रदर्शन अदानी फाउंडेशन कार्यक्रम अधिकारी राहुल शेजव यांनी केले.कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी अदानी फाउंडेशनचे कैलाश रेवतकर, स्वप्निल वाहने, मिनेश कटरे, अपूर्वा पाटील यांनी परिश्रम घेतले.

error: Content is protected !!
Exit mobile version