आयआयएचटी बरगढ किंवा वेंकटगिरी येथे प्रथम व द्वितीय वर्षाकरिता प्रवेश सूचना

0
7

मुंबई, दि. २६ : केंद्र सरकारच्या भारतीय तंत्रविज्ञान संस्थेतील सन २०२३-२४ या शैक्षणिक सत्राकरिता तीन वर्षीय (सहासत्रीय) हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका अभ्यासक्रमाचा प्रथम व द्वितीय वर्षाकरिता महाराष्ट्र राज्यातून बरगढ (ओडिशा) करिता १३ जागा, आर्थिकदृष्या दुर्बल घटकाकरिता १ जागा तसेच वेंकटगिरीकरिता २ जागेच्या प्रवेशासाठी पात्र उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. यासाठी प्रादेशिक उपआयुक्त वस्त्रोद्योग नागपूर/सोलापूर/मुंबई/औरंगाबाद यांच्यामार्फत विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. दि. २० जून २०२३ पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन नागपूरचे वस्त्रोद्योग आयुक्त एम. जे. प्रदीप चंदन यांनी केले आहे.

इच्छुक उमेदवारांनी परिपूर्ण अर्ज दि. २० जून २०२३ पर्यंत संबंधित प्रादेशिक उपआयुक्त वस्त्रोद्योग कार्यालयाकडे सादर करावेत. प्रवेश अर्जाचा नमुना व इतर अनुषंगिक माहिती वस्त्रोद्योग आयुक्तालयाचे http://http.www.dirtexmah.gov.in वर उपलब्ध आहे. शिवाय अर्जाचा नमुना सर्व प्रादेशिक उपआयुक्त वस्त्रोद्योग यांच्या कार्यालयात देखील उपलब्ध आहे, असे श्री. चंदन यांनी कळविले आहे.