मॉडेल कॉन्वेंट एण्ड सायन्स ज्यू. कॉलेज गोरेगाव मधील विज्ञान शाखेतून प्रतीक्षा बोपचे तालुक्यात प्रथम

0
19

गोरेगांव :- स्थानीय मॉडेल कॉन्वेंट एण्ड सायन्स ज्यू. कॉलेज गोरेगाव मधील विद्यार्थ्यानी सायन्स शाखेची यशाची परंपरा कायम ठेवत यावर्षी सुद्धा 100% निकाल देऊन शाळेला गौरवांवित केलेला आहे. यामध्ये कु. प्रतीक्षा उमराव बोपचे हि 83.33 % घेत तालुक्यातून प्रथम आलेली आहे. कु अंजली जगदीश बोपचे ही 81.33 % घेत शाळेतून दुसरी तर अपूर्वा माधोराव आदमने ही शाळेतून तिसरी आलेली आहे. शाळेचे संस्थापक प्रा.आर. डी. कटरे, प्रशासकीय अधिकारी सी. बी. पटले, प्राचार्य सौ सी. पी.मेश्राम, पर्यवेक्षक कु.एस. डी. चीचामे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून अभिनंदन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय शाळेचे संस्थापक, प्रशासकीय अधिकारी, प्राचार्य, पर्यवेक्षक, सर्व शिक्षकवृंद तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच आपल्या आई वडिलांना दिले.