Home शैक्षणिक विद्या निकेतन येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

विद्या निकेतन येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

0

बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल ९७ टक्के

आमगाव: येथील विद्या निकेतन कनिष्ठ महाविद्यालयात नुकताच जाहीर झालेल्या बारावी बोर्ड परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रम (ता. २९)आयोजित करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थासचिव बबनसिंह ठाकूर होते.प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य डी.एस. टेंभुर्णे उपस्थित होते.मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यी व पालकांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला व त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
कनिष्ठ महाविद्यालयाचा एकूण निकाल ९७ टक्के लागला असून विज्ञान शाखेचा १०० टक्के,वाणिज्य ९५.५७ टक्के,कला ९४ टक्के व एचएससी-व्होकेशनल विभागाचा ९७.६४ टक्के निकाल लागला.यात महाविद्यालयातून विज्ञान शाखेतून कुमकुम पटले ८४.८३ टक्के गुण घेऊन प्रथम, टिना अग्रवाल ८४.१७ टक्के गुण घेऊन द्वितीय व देवेंद्र माहुले ८४ टक्के गुण मिळवून तृतीय आला. तालुक्यातून वाणिज्य शाखेतून बाबा गायधने ८४.६७ टक्के गुण मिळवून प्रथम, हर्षल शिवणकर ८४ टक्के गुण घेऊन द्वितीय व माहेश्वरी खोब्रागडे ८२.५० टक्के गुण घेऊन तृतीय आली. कला शाखा मराठी माध्यमातून माधवी फुंडे ७८.८३ टक्के गुण घेऊन प्रथम, साक्षी नागवंशी ७५.१७ टक्के गुण घेऊन द्वितीय व प्राची चुटे ७३.६७ टक्के गुण घेऊन तृतीय आली. कला शाखा हिंदी माध्यमातून किरण गुप्ता ८१ टक्के गुण मिळवून प्रथम, यशोदा झलरीया ६९.६७ टक्के गुण मिळवून द्वितीय व रितू खडसाम ६८.१७ टक्के गुण घेऊन तृतीय आली. तसेच एचएससी-व्होकेशनल विभागातून तालुक्यात इलेक्ट्रीकल टेक्नाॅलाॅजी मधून अष्टदिप मेश्राम याने ७८.६७ टक्के गुण मिळवून प्रथम, पवन फुंडे व महेंद्र कटरे यांनी ७६.५० टक्के गुण मिळवून द्वितीय व सितेश दमाहे व अस्मित साखरे यांनी ७५.३५ टक्के गुण मिळवून तृतीय आले आहेत. ऑटोमोबाइल टेक्नाॅलाॅजी मधून आदित्य वाकले याने ७३.३३ टक्के गुण मिळवून प्रथम, मोहित हरिणखेडे याने ७१.८३ टक्के गुण घेऊन द्वितीय व वैभव भोंडे याने ७०.३३ टक्के गुण घेऊन तृतीय आला आहे. तर अकाॅउंटिंग अँड ऑफिस मॅनेजमेंट मधून भाग्यश्री शिवणकर हिने ८०.८३ टक्के गुण मिळवून प्रथम, पूजा शेंडे हिने ८०.५० टक्के गुण घेऊन द्वितीय व अश्विनी कटरे हिने ८०.३३ टक्के गुण घेऊन तृतीय आली आहे.
सत्काराप्रसंगी संस्थासचिव बबनसिंह ठाकूर व प्राचार्य डी.एस. टेंभुर्णे यांनी समयोचित मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांना अभिनंदनासह शुभेच्छा दिल्या. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन प्रा.जी.एस. लोथे यांनी केले व आभार प्रा. जी. बी. तरोणे यांनी मानले. कार्यक्रमाला सर्व प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थ्यी उपस्थित होते.

Exit mobile version