स्पर्धा परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
गोंदिया : विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी शाळेतील विविध उपक्रमाच्या माध्यमातून त्यांच्या कला गुणांचा शोध घेऊन प्रोत्साहीत करण्यात येते. या अनुसंगाने जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कारंजा येथील वर्ग सहावीच्या विद्यार्थ्यांचे स्पर्धा परीक्षा तसेच राखी तयार करणे स्पर्धा घेण्यात आली होती. यामध्ये जवळपास ४० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थ्यांची निवड करून त्यांचा सत्कार करण्यात आला.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कारंजा येथे नाविण्यपूर्ण उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा शैक्षणिक गुणवत्ता वाढीला प्रोत्साहन दिले जात आहे. या अनुसंगाने शाळेतील विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा आयोजित केल्या जातात. यानुरूप सहावीच्या विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा व राखी तयार करणे स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत चेतना ताराम प्रथम, शुभांगी करंगकार व्दितीय, वंशिका मेश्राम तृतीय, अक्ष रंगारी चौथा तर पाचवा क्रमांक क्रिश ढोमणे यांनी पटकाविला. या विद्यार्थ्यांना ८ सप्टेंबर रोजी आयोजित बालसभेत सन्मानित करण्यात आले.
बालसभेच्या अध्यक्षस्थानी पुर्वी साखरे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून दिया वाघाडे हे विद्यार्थी होते. स्पर्धा परीक्षेत प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांना वर्गशिक्षक एल.यु.खोब्रागडे यांच्याकडून शब्दकोष तर भाग घेणार्या सर्व विद्यार्थ्यांना पेन वाटप करण्यात आली. याप्रसंगी शिक्षक एल.यु.खोब्रागडे, एम.एम.चौरे, नरेश बडवाईक, किशोर रहांगडाले, हेमंत रूद्रकार, संगीता निनावे, वर्षा कोसरकर, पुजा चौरसिया, रंजना रावते आदि सर्व शिक्षक उपस्थित होते.
००००००