धोटे बंधू विज्ञान महाविद्यालयातर्फे ‘ओझोन’ दिवस साजरा

0
6

गोंदिया,दि.21-गोंदिया शिक्षण संस्था द्वारा संचालित धोटे बंधू विज्ञान महाविद्यालयाच्या सायन्स फोरम,मायक्रोबायोलॉजी विभाग आणि बायोटेक्नॉलॉजी विभागातर्फे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अंजन नायडू,तसेच
महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.जयंत महाखोडे यांच्या मार्गदर्शनाखाली ओझोन दिवस 2023 साजरा करण्यात
आले.याप्रसंगी विद्यार्थ्यांसाठी घोषवाक्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी ओझोन लेयरचे सरंक्षण यावर विविध घोषणा तयार केल्या आणि ओझोनच्या थराचा ऱ्हास कमी करण्याचे मार्ग आणि सूर्याचे हानिकारक अतिनील किरणांपासनू पृथ्वीचे सरंक्षण करण्यासाठी ओझोनचे महत्व परीक्षकांसमोर मांडले. त्यानतंर विद्यार्थ्यांनी ओझोनच्या थराचा ऱ्हास कमी करण्यासाठी उचलल्या जाऊ शकणाऱ्या पावलांबाबत जागरूकता पसरवण्याची प्रतिज्ञा घेतली.
स्पर्धेत प्रथम क्रमांक बीएससी बायोटेक्नॉलॉजी व्दितीय वर्षाच्या कु.इशा सहारे तसेच व्दितीय क्रमांक कु.वैष्णवी तिवारी हिने पटकावला.तृतीय क्रमांक बीएससी बायोलॉजी व्दितीय वर्षाच्या कु.सिमरन आस्वानी हिने पटकावला.कार्यक्रमाची रूपरेखा डॉ.स्नेहा जैस्वाल समन्वयक विज्ञान मचं यांनी मांडली.स्पर्धेचे परीक्षण प्राध्यापक धर्मवीर चौहान,प्रमुख सुक्ष्मजीवशास्त्र आणि जवै तंत्रज्ञान व डॉ. आनदं मोरे, सहाय्यक प्राध्यापक भौतिकशास्त्र विभाग यांनी केले.कार्यक्रमाचे सत्रूसंचालन प्रा.अवनी मेठी यांनी केले. कार्यक्रमाच्या आयोजनाकरिता प्रा.रीदा खान,प्रा.रिया चतुर्वेदी,प्रमोद परिहार व सुनील ठवकर यांनी परिश्रम घेतले.