हरिहरभाई पटेल हायस्कूल येथे व्यक्तीमत्व विकास कार्यक्रमाचे आयोजन

0
4

आमगाव,दि.२८– तालुक्यातील हरिहरभाई पटेल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय चिरचाळबांध येथे व्यक्तीमत्व विकास कार्यक्रमाचे आयोजन प्राचार्य बन्सीधर शहारे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते.या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून इंडिया वेन्गार्ड इंन्टेरीअल प्रा.लि.सिंगापुरचे घनश्याम ऊके यांनी आपल्या जिवन प्रवासाची माहिती आमगाव तालुक्यापासून कशी झाली यावर माहिती दिली.तसेच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास खेळ आणि व्यायाम यात सहभागी होऊनच जास्तीत जास्त होऊ शकतो असेही सांगितले.तत्पुर्वी प्रा.परमानंद चुटे यांनी परिचय करून देताना त्यांना आयर्न मॅन म्हणून संबोधले जाते असे सांगितले.
या कार्यक्रमाला प्रा बांदरे, तितीरमारे,के.जी मडावी,डि.बी.चव्हाण,एल.एफ.लांडगे,आर.एस.कामते,आर.यु.बागळकर.धर्मेंद्र मेहर,कु.निता कांबळे,के.जे.बर्वे,पी.एच.कामथे, अनिल भवरीया,एस बी.बिसेन,कु वंदना ईलमकर, डी.एस.हरिणखेडे, डी.बी.मेश्राम,व्हि.एम.हत्तीमारे आणि इतर सर्व कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.परमानंद चुटे यांनी केले तर आभार प्रा.धर्मेंन्द्र मेहर यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.