स्नेहसंमेलन म्हणजे विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव देणारा मंच:- इंजि यशवंत गणविर

0
9

सडक अर्जुनी,दि.११-तालुक्यातील लोकमान्य टिळक विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय कोकणा जमी येथे तीन दिवसीय शालेय स्नेहसंमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा सभापती शिक्षण क्रीडा व आरोग्य इंजि यशवंत गणविर यांनी उपस्थित राहुन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी ते म्हणाले की,आजचे युग हे स्पर्धेचे तंत्रज्ञानाचे युग आहे आणि या युगात टिकून राहण्यासाठी शिक्षण हा महत्त्वाचा घटक आहे कारण शिक्षणामुळे मानवाचा सर्वांगीण विकास घडून येत असतो.स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव मिळतो आपल्या अंगी असलेल्या कला प्रदर्शित करण्याची संधी त्यांना प्राप्त होते.म्हणुन शाळांमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित केल्या जाते.
पुढे बोलताना ते म्हणाले की, विद्यार्थी मित्रांनो निव्वळ पुस्तकी ज्ञानापुरता मर्यादित न राहता आपल्या शालेय जीवनातच सामाजिक, सांस्कृतिक,राजकीय व आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी प्रयत्न करा कारण तुम्हीच उद्याचे भविष्य आहात‌ आणि हि क्रांती आपल्याला घडवून आणायची असेल तर आधी शिक्षित सुशिक्षित सुसंस्कृत व सृजनशील नागरिक बना,असे प्रतिपादन त्यांनी केले.
या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांच्या शुभहस्ते,माजी प्राचार्य यशवंत परशुरामकर यांच्या अध्यक्षतेखाली,जि.प.सदस्या कविताताई रंगारी, पंचायत समिती सदस्य शिवाजी गहाणे, प्राचार्य भाऊराव पत्रे, डॉ अविनाश काशीवार सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती सडक अर्जुनी, लक्ष्मीकांत धानगाये, प्राचार्य डी.आर.दिक्षीत यांच्या उपस्थितीत पार पडले.यावेळी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी तथा पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.