जल जीवन मिशन अंतर्गत तालुकास्तरीय वकृत्व स्पर्धा संपन्न

0
8

देवरी,दि.१५- गोंदिया जिल्हा परिषदेच्या वतीने जलजीवन मिशन अंतर्गत तालुका स्तरीय वकृत्व स्पर्धेचे आयोजन गेल्या शुक्रवारी (दि.१२) देवरी येथे करण्यात आले होते.

स्थानिक गटसाधन केंद्रात आयोजित या स्पर्धेत तालुक्यातील सर्व महाविद्यालयीनसह कनिष्ट महाविद्यालयातील  १२ स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदवला. सदर स्पर्धेमध्ये  महाविद्यालयीन गटातून प्रतिक राऊत यांने पहिला क्रमांक तर संजना मडावी आणि भूमेश्वरी बहेकार यांनी अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय स्थान मिळविले.

कनिष्ट महाविद्यालयीन गटातून लीना शेडमाके, प्रियंका अमृतकर आणि  प्रतिक बहेकार यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि कृतीय क्रमांक मिळविला.

या स्पर्धेमध्ये विषय तज्ज्ञ  विजय लोथे आणि शंकर वलथरे यांनी पर्यवेक्षक म्हणून काम पाहिले. विजेतांचे पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.