भुवेंद चव्हाण यांना विभाग स्तरीय उत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी पुरस्कार

0
7

अर्जुनी मोर.-राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी भुवेंद मोडकू चव्हाण जयदुर्गा ज्युनियर कॉलेज गौरनगर ता. अर्जुनी मोर जी. गोंदिया नागपूर विभाग यांना विभाग स्तरीय उत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी पुरस्कार बुलढाणा जिल्ह्यातील विवेकानंद आश्रम हिवरा येथे राज्य स्तरीय राष्ट्रीय सेवा योजना शिबीर अमरावती शिक्षण विभागाचे सहायक संचालक सिध्देश्वर काळुसे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
सदर पुरस्कार महाराष्ट्र राज्य शिक्षण संचालनालय पुणेच्या वतीने आयोजित करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष आर. बी. मालपाणी,प्रा.विलास बैलमारे विभागीय समन्वयक नागपूर,प्रा.विशाल जाधव विभागीय समन्वयक अमरावती,प्रा.विनोद गवारे विभागीय समन्वयक मुंबई, डॉ. संदीपान जगदाळे विभागीय समन्वयक लातूर, प्राचार्य आर. डी. पवार यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
राष्ट्रीय सेवा योजना अतंर्गत विविध सामाजिक उपक्रम राबवल्या बद्दल राष्ट्रीय सेवा कार्याचे महत्त्व सामाजिक सलोखा, राष्ट्रीय सेवा योजनेच्यवतीने ग्रामीण भागात विषेश शिबीर आयोजित करून विध्यार्थ्यांना समाजसेवेचे कार्य ऊपलब्ध केल्याबद्दल नागपूर विभागात शै. शत्र. 2022-23 चा विशेष पुरस्कार देण्यात आला.अशोक चांडक अध्यक्ष श्री गणेश बहुउद्देशीय संस्था अर्जुनी मोर,डॉ. राजेश चांडक सचिव श्री गणेश बहुउद्देशीय संस्था अर्जुनी मोर, प्राचार्य सुनील पाऊलझगडे जयदुर्गा दुर्गा ज्युनियर कॉलेज गौरनगर, गणेश भदाडे जिल्हा समन्वयक गोंदिया, श्रीगुरूदेव सेवा मंडळ ता. अर्जुनी मोर. च्या वतीने दुर्योधन मैंद , ऊध्दव मेहेंदळे यांनी अभिनंदन केले.