चित्रकला स्पर्धेत लीला ढोमनेच घवघवीत यश

0
5

अर्जुनी मोरगाव: जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन व कक्ष, जिल्हा परिषद गोंदिया अंतर्गत आयोजित जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेत माध्यमिक गटातून स्थानिक सरस्वती विद्यालयातील वर्ग 10 वी ची विद्यार्थिनी कु. लीना हरीश ढोमणे हिचा जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक आला. दिनांक 1 मार्च 2024 शुक्रवारला तिचा गोंदिया येथे तीचा सत्कार करण्यात आला तिला प्रशस्तीपत्र, स्मृतिचिन्ह, व 21 हजार रुपये असा पुरस्कार देण्यात आला. शाळेचे प्राचार्य जे.डी. पठान,उपप्राचार्या छाया घाटे, पर्यवेक्षक महेश पालीवाल यांनी तीचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.तसेच समस्त शिक्षकवृंदांनी तिचे अभिनंदन केले. तसेच तिला मार्गदर्शन करणारे कलाशिक्षक रूपराम धकाते यांचे सुद्धा अभिनंदन करण्यात आले.