जिल्हा परिषद हायस्कूल येथील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

0
4

अर्जुनी मोर. – जिल्हा परिषद हायस्कूल तथा कनिष्ठ कला व विज्ञान महाविद्यालय अर्जुनी मोर. येथील इयत्ता बारावी व दहावीच्या परिक्षेत गुणानुक्रमे आलेल्या विद्यार्थ्यांचा शाळा व्यवस्थापन समीतीचे वतीने ता.28 मे रोजी सत्कार करण्यात आला.
यामधे इयत्ता 12 वी मधे विज्ञान शाखेत महाविद्यालयातुन प्रथम अल्लेशा ढवळे, द्वितीय जयंता नाकाडे, तर तृतिय क्रमांकाने उत्तीर्ण श्रृती लोणारे, तसेच कला शाखेत प्रथम क्रमांक कु.अंजली नेवारे, द्वितीय कु.अंजली कांबळे, तृतीय कु.मिनाक्षी गजापुरे, तसेच इयत्ता दहावीच्या परिक्षेत प्रथम क्रमांक वेदांत डोंगरे, द्वितीय प्रणय मेश्राम, तृतीय क्रमांक कु.योगिता मेश्राम या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार शाळा व्यवस्थापन समीतीचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य पोर्णिमा ढेंगे यांचे हस्ते करण्यात आला.यावेळी शाळा व्यवस्थापन समीतीचे उपाध्यक्ष तथा पंचायत समिती सदस्य संदिप कापगते ,सदस्य प्रमोद नेवारे,प्रभारी प्राचार्य डब्लु. व्हि.येरणे तथा विद्यालयातील प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.