कदमापूर शाळेत चक्क साकारली जर्मन भाषा एक्स्प्रेस,विद्यार्थी उच्चारु लागले जर्मन शब्द

0
84

बुलढाणा,दि.०७ः-जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील जि.प.म.उच्च प्राथमिक शाळा कदमापूर येथे चक्क जर्मन भाषा एक्स्प्रेस साकारण्यात आली असून विद्यार्थ्यांनी जर्मन भाषेचे धडे गिरवायला सुरवात केली आहे.प्रत्येक विद्यार्थ्यांत जे काही दडलेले असते ते बाहेर काढण्याची कला म्हणजे शिक्षण.स्वामी विवेकानंद यांनी मनुष्यातील पुर्णत्वाचा आविष्कार म्हणजे शिक्षण अशी व्याख्या केली आहे.खरं ज्ञान हे आतुन येते.प्रत्येक विद्यार्थी हा वेगळा असतो आणि विद्यार्थ्यातील वेगळेपणाला बहर यावा यासाठी शाळेने केलेला हा प्रयत्न प्रशंसनीय ठरला आहे.विशेष म्हणजे जि.प.म.उच्च प्राथमिक शाळा कदमापूर शाळेचे मुख्याध्यापक श्रीधर पल्हाडे यांच्या नेतृत्वाखाली,शिक्षक राजेश कोगदे यांच्या संकल्पनेतून आणि गावकरी व शिक्षकवृंद यांच्या सहकार्यातून साकारलेला हा प्रयोग यशस्वी ठरला आहे.
जर्मन भाषा तज्ञांनी जर्मन भाषा 6 स्तरात विभागलेली आहे.ते म्हणजे ए1,ए2,बी1,बी2,सी1,सी2 असे ते स्तर आहेत.साधारणतः जर्मनीमध्ये रोजगार करण्यासाठी जायचे असल्यास ए 2 तसेच बी 2 स्तरापर्यंत भाषेचे ज्ञान असणे आवश्यक असते.हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून ए 1 स्तराचे जर्मन भाषेचे ज्ञान जर्मन भाषा एक्स्प्रेसवर साकारण्यात आलेले आहे.विद्यार्थ्यांना आनंददायी पद्धतीने पाठ्यपुस्तकाबाहेरील ज्ञान मिळविता यावे.आणि भविष्यात निर्माण होणाऱ्या संधींचा विद्यार्थ्यांना वेध घेता यावा.हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून या शाळेने हा प्रयत्न केलेला आहे.
विद्यार्थ्यांना परकीय भाषेची ओळख व्हावी,परकीय भाषेबद्दल आपुलकी,आदर निर्माण व्हावा आणि परकीय भाषा शिकणे अवघड नसते हा दृष्टिकोन विद्यार्थ्यांत विकसित व्हायला यानिमित्ताने हातभार लागणार.कोणत्या देशात कोणती भाषा बोलल्या जाते, कोणत्या देशात रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत.आणि कोणत्या रोजगारासाठी कोणत्या देशात कोणत्या भाषेचे किती स्तरापर्यंत ज्ञान आवश्यक असते.तसेच शालेय शिक्षण घेता घेता आपण कोणती भाषा शिकायला पाहिजे या अंतर्ज्ञानाचा बहर विद्यार्थ्यांत यावा हा व्यापक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून ही जर्मन भाषा एक्स्प्रेस शाळेमध्ये साकारण्यात आलेली आहे.

सर्व ग्रामस्थ , मुख्याध्यापक तथा शिक्षकवृंद कदमापूर यांच्या सहकार्यातून उभारलेली  *कदमापूर टू जर्मनी एक्स्प्रेस* कदमापूर शाळेतील विद्यार्थ्यांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू बनली आहे.या एक्स्प्रेसच्या माध्यमातून व कोगदे सरांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना जर्मन भाषेची तोंडओळख होत आहे ही आनंदाची बाब आहे.*रविंद्र चेके**केंद्रप्रमुख पळशी*

*कदमापूर टु जर्मनी एक्स्प्रेस* या एक्सप्रेसच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना जर्मन भाषेची तोंडओळख होण्यास निश्चितच मदत होणार आहे.याशिवाय परकीय भाषांबद्दलचा आदर,परकीय भाषा शिकण्याची आवड विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होऊन भाषा शिकणे हे अवघड नसते हा आत्मविश्वास विद्यार्थ्यांमध्ये रुजविणे यासाठीचा हा प्रामाणिक प्रयत्न.*श्रीधर पल्हाडे*        *उच्च श्रेणी मुख्याध्यापक कदमापूर*