धोटे बंधु विज्ञान महाविद्यालयातील ३ संशोधन प्रकल्पाची राज्यस्तावर निवड

0
444

गोंदिया : शिक्षण संस्था, गोंदिया द्वारा संचालित घोटे बंधु विज्ञान महाविद्यालय, गोंदिया च्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठस्तरावर आयोजित अविष्कार २०२४-२५ स्पर्धेत संस्थेचे सचिव श्री राजेन्द्रजी जैन, संचालक श्री निखिलजी जैन, प्राचार्य डॉ. अंजन नायडू, डॉ. जे. जी. महाखोडे याच्या प्रेरणेमुळे सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदके पटकावून महाविद्यालयाचे नाव उज्जवल केले.

ही स्पर्धा विद्यार्थ्यांना नावीन्यपूर्ण संकल्पनांचे सदरीकरण करणारे एक महत्वपूर्ण व्यासपीठ आहे. विज्ञान श्रेणी (पीपीजी स्तर) राजकुमार मुलचंद पटले, शेती आणि पशुपालन श्रेणी (युजी स्तर) चहक भुवनेश्वर पारधी व इंजिनिअरिंग आणि तंत्र ज्ञान श्रेणी (युजी स्तर) कल्याणी चिंघालोरे याच्या संशोधन प्रकल्पाची विद्यापीठ स्तरावर निवड करण्यात आली असुन आता ते राज्यस्तरीय अविष्कार संशोधन डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे रायगढ येथे १२ ते १५ जानेवारी भाग घेणारे आहेत. सर्व संशोधन प्रकल्पांना डॉ. दिलिप चौधरी (प्राध्यापक भौतिक शास्त्र), डॉ. मनोज पटले (प्राध्यापक रसायन शास्त्र) आणि प्रा. मनिष बावनकर यांनी मार्गदर्शन केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अंजन नायडू यांनी विजेत्यासह मार्गदर्शकाचे अभिनंदन केले.