गोरेगांव –तालुक्यातील जि.प.प्राथ.शाळा सोनेगांवचे वार्षिक स्नेहसम्मेलन 5 व 6 फेब्रुवारीला उत्साहात पार पडले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजकुमार यादव माजी उपसभापती हे होते.उदघाटन प्राचार्य डाॕ.धर्मेंद्र तुरकर यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी सरपंच सौ.भुमेश्वरी ठाकरे ,तंटामुक्तीअध्यक्ष मुनेश्वर वारई,पोलिस पाटील प्रकाश पारधी,शाळा समिती अध्यक्ष दुर्गेश तुमसरे,सौ.किरण पारधी व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.यावेळी पाहुण्यांनी शाळेचे निरीक्षण करुन शाळेच्या विविध नाविन्यपूर्ण उपक्रमाची माहिती घेऊन कौतुक केले.डाॕ.धर्मेंद्र तुरकर यांनी पालकांना विशेष मार्गदर्शन केले.विद्यार्थ्यांनी नाटिका,एकपात्रीअभिनय,समुह नृत्य यांचे आकर्षक सादरीकरण केले.प्रमुख पाहुण्यांचे हस्ते विद्यार्थ्यांना बक्षिस वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे संयोजन मुख्याध्यापक आर.एन.घारपिंडे यांनी तर संचालन व प्रास्ताविक देवेंद्रकुमार धपाडे यांनी केले.