प्रहारच्या मागणीची पूर्तता, शिक्षक आंतरजिल्हा बदली प्रक्रिया सुरू .!

0
522

शिक्षण मंत्री व ग्रामविकास मंत्र्यांनी घेतली दखल…

राज्यातील बदली प्रतीक्षेतील आठ हजार शिक्षकांना न्याय मिळणार.

नागपूर,दि.०१ः प्रहार शिक्षक संघटनेच्या मागणीनुसार आंतरजिल्हा बदली या ऑनलाईन पद्धतीने राबवल्यामुळे आतापर्यंत जवळपास १५००० शिक्षक हे स्व जिल्ह्यात बदलीने स्थिरावले आहेत.

प्रहार शिक्षक संघटनेच्या शासन स्तरावरील सततच्या पाठपुराव्याने आतापर्यंत २०१७ पासून शासनाने जिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाईन आंतरजिल्हा बदलीचे सहा टप्पे राबविले होते.यामुळे राज्यातील १५ हजार शिक्षक आपल्या स्व जिल्ह्यात स्थिरावले होते. ऑनलाईन बदली प्रक्रिया राबवल्याने आर्थिक व्यवहारांना आळा बसून बदली प्रक्रियेतील भ्रष्टाचार संपुष्टात आला होता. त्यामुळे हे बदली धोरण कायम ठेवण्याची आग्रही भूमिका प्रहार शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष महेश ठाकरे यांनी शासनाला वारंवार निवेदन देऊन मांडली होती. परंतु माजी शिक्षण मंत्री यांनी बदली धोरण बंद संदर्भात काढलेल्या शासन आदेशामुळे राज्यातील शिक्षकांमध्ये अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले होते. त्या संदर्भात शिक्षण मंत्री ना.दादाजी भुसे तसेच ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना निवेदन देऊन सातवा टप्पा राबवण्याची विनंती प्रहार शिक्षक संघटनेच्या माध्यमातून करण्यात आली होती.

सदर निर्णयाची दखल घेत नुकताच ग्राम विकास विभागाने २८ फेब्रुवारी २०२५ ला आदेश काढत आंतर जिल्हा बदली प्रक्रिया राबवण्याचा कार्यक्रम जाहीर केलेला आहे.त्यानुसार १० मार्च ते ६ एप्रिल दरम्यान आंतरजिल्हा बदली प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. या निर्णयाने राज्यातील जिल्हा परिषद मधील आंतर जिल्हा बदली प्रतीक्षेतील आठ हजार शिक्षकांना आपल्या सह जिल्ह्यात जाण्यासाठी न्याय मिळणार आहे. प्रहार शिक्षक संघटनेच्या सततच्या पाठपुराव्याला मोठे यश प्राप्त झाले असून यामुळे शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

असा आहे कार्यक्रम

१० मार्चपर्यंत शिक्षकांची माहिती पोर्टलवर अद्यावत करणे ,
११ ते १३ मार्च रिक्त पदांची माहिती पोर्टलवर नोंदवणे
१४ मार्च ते २० मार्च ऑनलाईन अर्ज सादर करणे
२१ ते २५ अर्जांची पडताळणी करणे,
२६ ते २७ मार्च न्यायालयीन प्रकरणी व विभागीय स्तरावर अपील निकाली काढणे
२८ मार्च ते ६ एप्रिल प्रत्यक्ष बदली प्रक्रिया पूर्ण करणे.

शासनाने ऑनलाईन बदली धोरण कायम ठेवण्यासंदर्भात तसेच टप्पा क्रमांक सात राबविणे संदर्भात प्रहार शिक्षक संघटनेने सतत जो पाठपुरावा केला त्याबद्दल राज्यातील आंतरजिल्हा बदली प्रतीक्षेत असलेल्या शिक्षकांनी समाधान व्यक्त केले आहे.

आंतरजिल्हा बदली प्रक्रिया करिता राज्य रोस्टरची मागणी

जिल्हा परिषद शिक्षकांच्या हेतू हेड आंतरजिल्हा बदल्या व्हाव्या यासाठी शिक्षकांची राज्यस्तरीय बिंदू नामावली व्हावी याकरिता प्रहार शिक्षक संघटनेचा पाठपुरावा सुरू असून या संदर्भातील लवकरच न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे.

-महेश ठाकरे, राज्याध्यक्ष , प्रहार शिक्षक संघटना.