Home शैक्षणिक IIM नागपूरमध्येच – शिक्षणमंत्री विनोद तावडेंची घोषणा

IIM नागपूरमध्येच – शिक्षणमंत्री विनोद तावडेंची घोषणा

0

नागपूर, दि. २४ – इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट म्हणजेच आयआयएमची स्थापना नागपूरमध्येच केली जाईल अशी महत्त्वपूर्ण घोषणा राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केली आहे. नागपूरमध्ये सुमारे २०० एकरच्या जागेवर आयएमएमची शाखा सुरु केली जाईल असे समजते.
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने राज्यात आयआयएम सुरु करण्याचा निर्णय घेतला होता. यासाठी मुंबई, पुणे, औरंगाबाद आणि नागपूर या चार शहरांचा विचार सुरु होता. यापैकी नागपूर आणि औरंगाबादची नावे आघा़डीवर होती. नागपूरमध्ये एकही मोठे शैक्षणिक केंद्र नाही. तसेच राज्यात व केंद्रात सध्या नागपूरचे राजकीय वजन वाढल्याने नागपूर आयएमएमसाठी पहिली पसंती होती. तर मराठवाड्यातील औरंगाबादमध्ये आयआयएमची स्थापना व्हावी यासाठी स्थानिक आमदार व उद्योजकांचे प्रयत्न सुरु होते. त्यामुळे आयएमएमवरुन मराठावाडा विरुद्ध विदर्भ असा संघर्ष निर्माण झाला होता. बुधवारी राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विधानपरिषदेत आयएमएम नागपूरमध्येच सुरु होणार असल्याची घोषणा केली.

error: Content is protected !!
Exit mobile version