पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून 1786 बेरोजगारांना रोजगार

0
25

गडचिरोली, दि 31 –गडचिरोली जिल्हा पोलीस दलाच्या वतीने पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांचे मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या “पोलीस दादालोरा खिडकी” च्या माध्यमातुन आतापर्यंत जिल्ह्यातील 1786 युवक- युवतींना रोजगार मिळाला आहे. तसेच कुक्कूटपालन व शिवणकाम प्रशिक्षण पुर्ण केलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील बेरोजगार युवक-युवतींकरीता आज 30 ऑगस्ट रोजी स्वयंरोजगार मेळाव्याचे आयोजन पोलीस मुख्यालय परिसरातील एकलव्य धाम येथे करण्यात आले होते.

गडचिरोली पोलीस दल, बीओआय आरसेटी गडचिरोली, कृषी विज्ञान केंद्र, गडचिरोली व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) सोनापूर यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या या स्वयंरोजगार मेळाव्यास कृषी विज्ञान केंद्र अंतर्गत 55 व बीओआय आरसेटी अंतर्गत 35 असे एकुण 90 कुक्कुटपालन प्रशिक्षणार्थी तसेच बीओआय आरसेटी अंतर्गत शिवणकाम (टेलरींग) प्रशिक्षण पुर्ण केलेल्या 35 प्रशिक्षणार्थी, अशा एकुण 125 प्रशिक्षणार्थ्यांनी आपला सहभाग स्वयंरोजगार मेळाव्यात नोंदवला. यावेळी कुक्कुटपालन प्रशिक्षण पुर्ण केलेल्या 90 उमेदवारांना कुक्कुटपालन व्यवसाय सुरु करण्यासाठी रोड आयस्लँड रोड जातीचे प्रत्येकी 10 नग कुक्कुटपक्षी (चिक्स), 10 किलो खाद्य, भांडी व इतर साहीत्य वितरीत करण्यात आले व आरसेटी अंतर्गत शिवणकाम प्रशिक्षण पुर्ण केलेल्या 35 युवतींना शिलाई मशिन वितरीत करण्यात आले व प्रशस्तीपत्र वितरण करण्यात आले.

गडचिरोली पोलीस दलाच्या पुढाकाराने सुरु असलेल्या पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून आतापर्यत गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम व अतिदुर्गम भागातील बेरोजगार युवक-युवतींना ब्युटी पार्लर 35, मत्स्य पालन 25, कुक्कुटपालन 125, शिवणकाम 35, मधुमक्षिकापालन 32 व शेळीपालन 67 अशा एकुण 319 बेरोजगार युवक युवतींना प्रशिक्षण देवुन स्वयंरोजगारासाठी आत्मनिर्भर केले आहे. तसेच हॉस्पीटॅलिटी, ऑटोमोबाईल प्रशिक्षण, सुरक्षा रक्षक व नर्सिंग असिस्टंट म्हणुन आज पर्यंत 1786 ग्रामीण गरीब व गरजु युवक-युवतींना प्रशिक्षण देवुन रोजगार उपलब्ध करून देण्यात आले आहे.