Home रोजगार करियर कट्टा अंतर्गत मार्गदर्शन शिबिराचे शिवप्रसाद सदानंद जायस्वाल महाविद्यालयात आयोजन

करियर कट्टा अंतर्गत मार्गदर्शन शिबिराचे शिवप्रसाद सदानंद जायस्वाल महाविद्यालयात आयोजन

0

अर्जुनी-मोर –स्थानिक शिवप्रसाद सदानंद जायस्वाल महाविद्यालय आणि महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग तसेच महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानाने करियर कट्टा कार्यक्रमांतर्गत मार्गदर्शन शिबिर 22 एप्रिल २०२२ रोज शुक्रवारला घेण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ ईश्वर मोहुर्ले यांच्या अध्यक्षतेखाली तसेच IQAC समन्वयक डॉ के.जे.सीबी यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आले.करियर कट्टा या उपक्रमाचे राज्य समन्वयक  यशवंत शितोळे हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.
समन्वयक डॉ नितीन विलायतकर यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात करियर कट्ट्याचे कार्यक्रम आयोजनामागील भूमिका विशद केली.यशवंत शितोळे यांनी वर्तमान काळात युवावर्गाला आपले करियर घडविण्यासाठी करियर कट्ट्याचे महत्त्व पटवून दिले तसेच या अंतर्गत स्पर्धा , उद्योजक आपल्या भेटीला आयोजनसेच कौशल्य विकास संदर्भातील विविध योजनांची माहिती विद्यार्थ्यांना याप्रसंगी दिली. शक्तिशाली भारत घडविण्यासाठी युवकांनी करिअरच्या संधी शोधाव्यात हे अब्दुल कलाम यांच्या उदाहरणाद्वारे डॉ सीबी यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना सांगितले. विद्यार्थ्यांनी करियर कट्टा अंतर्गत होत असलेल्या विविध कार्यक्रमातून संधींचा लाभ घेऊन आपले करिअर घडवावे व आपल्या या माध्यमातून सर्वांगीन विकास साधावा, असे मत याप्रसंगी आपल्या अध्यक्षीय भाषणातून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ मोहुर्ले यांनी विशद केले.
कार्यक्रमाचे संचालन कु टीना कोसरे तर आभार प्रदर्शन कु किरण देशमुख हिने केले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ नितीन विलायतकर, डॉ डी एल चौधरी, डॉ एस बी बोरकर, प्रा.पंकज उके,मनोज झोळे, नितीन सिडांम, तसेच विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले

Exit mobile version