१४0 युवती नर्सिंग असिस्टंट प्रशिक्षणासाठी नागपूरला रवाना

0
23

गडचिरोली-जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार युवतींना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने पोलिस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून पोलिस दल व पार्कसन्स स्किल सेंटर नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने २४ डिसेंबर रोजी भव्य रोजगार मेळावा घेऊन पार्कसन्स स्किल सेंटर यांच्यामार्फत जिल्ह्यातील दुर्गम -अतिदुर्गम भागातील १४0 बेरोजगार युवतींची निवड करून पोलिस अधीक्षक निलोत्पल यांनी हिरवी झेंडी दाखवून नर्सिंग असिस्टेंट प्रशिक्षणासाठी नागपूरला रवाना करण्यात आल्या.
नर्सिंग असिस्टंट प्रशिक्षणाकरिता निवड झालेल्या उमेदवारांचे पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी सर्व युवतींना नियुक्तीपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. व त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले. जिल्ह्यातील युवक-युवतींना रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध करून देण्यासाठी पोलिस दल सदैव तत्पर असून, नेहमी तुमच्या पाठीशी राली. येणार्‍या सन २0२३ या नवीन वर्षात पोलिस दलाच्यावतीने दुर्गम-अतिदुर्गम भागातील युवक-युवतींसाठी १0 हजार नवीन रोजगार व स्वयंरोजार उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट आहे. आपले मित्र व आप्तस्वकीय यांना देखील रोजगाराच्या बाबतीत अवगत करून द्यावे व त्यानीही पोलिस दलाने उपलब्ध करून दिलेल्या रोजगाराच्या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.
मेळाव्यास अपर पोलिस अधीक्षक (अभियान) अनुज तारे, अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता, अपर पोलिस अधीक्षक अहेरी यतिश देशमुख, सेंटर हेड नितीन सेन गुप्ता, पार्कसन्स स्किल इन्स्टीट्युटचे हेमंत बन्सोड उपस्थित होते. आयोजनाकरिता सर्व उपविभागीय पोलिस अधिकारी, पोस्टे, उपपोस्टे व पोमकचे सर्व प्रभारी अधिकारी तसेच नागरी कृती शाखेचे प्रभारी अधिकारी धनंजय पाटील व अंमलदारांनी पर्शिम घेतले.

या शासकीय योजनांचा दिला लाभ
जनजागरण मेळाव्यात लव्हारी गावाकरिता र्मसिबल मोटार, र्मसिबल मोटार पाईप २00 फुट, मोटार स्टार्टर १, रस्सी २00 फूट, प्लास्टिक घमेले ५0, कप १५ सेट, पीएमजी दिशा कार्ड वाटप १५, आदी साहित्याचे वितरण करण्यात आले. तसेच आधार कार्ड अपडेट व नुतनीकरण ३५, आयुष्मान भार कार्ड १३, सातबारा, उत्पन्न दाखल ६, ई-र्शम कार्ड १६, पेन कार्ड ४, युनिवर्सल पास १, कोविड सर्टिफिकेट ३, मतदान कार्ड २, आदी योजनांचा लाभ देण्यात आला.

कुरखेडा-जिल्हा पोलिस प्रशासनांतर्गत पोलिस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून पोलिस स्टेशन पुराडाचचे वतीने पोलिस अधीक्षक निलोत्पल, अपर पोलिस अधीक्षक (अभियान) अनुज तारे, अपर पोलिस अधीक्षक कुमार चिंता, उपविभागीय पोलिस अधिकारी साहील झरकर यांच्या मार्गदर्शनात पुराडा पोलिसांच्यावतीने नक्षलग्रस्त अतिसंवेदनशील लवारी गावात २१ डिसेंबर रोजी जनजागरण मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात आदिवासी नागरिकांना विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यात आला.अध्यक्षस्थानी पुराडाचे वनपरिक्षेत्र अधिकारी दिघोडे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून पशुसवर्धन अधिकारी भामरे, मंडळ अधिकारी उन्हाळे, प्रभारी अधिकारी सपोनि पवार, रामगडचे पशू वैद्यकीय अधिकारी पटले, लव्हारीचे उपसरपंच अमित गावडे आदी उपस्थित होते.पोलिस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून दिल्या जाणार्‍या सर्व शासकीय योजनांबाबत मार्गदर्शन नागरिकांनी शासकीय योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक पोलिस निरीक्षक पवार यांनी यावेळी केले.