कौशल्य विकास प्रशिक्षणाचा लाभ घेऊन महिलांनी आत्मनिर्भर व्हावे – अनिल पाटील

0
10

गोंदिया दि.29 : महिलांना आत्मनिर्भर बनवून कुटूंबाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या दृष्टीने शासन अनेक उपाययोजना करीत आहे. त्याचाच एक भाग म्हणून महिलांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. या प्रशिक्षणाचा लाभ घेऊन महिलांनी आत्मनिर्भर व्हावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील यांनी केले.

          जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित औरंगाबाद येथील प्रशिक्षण केंद्रात निवड झालेल्या 20 महिलांची निवड झाल्यामुळे त्यांचा प्रमाणपत्र व ओळखपत्र देऊन सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे, युनिसेफचे Wash Climate Change & Environmental Sustanability (CCES) अधिकारी आनंद घोडके, प्रथम एज्युकेशन फाउंडेशन Head Plumbing Unit Training चे शिवाजी कदम, महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक संजय संगेकर, उमेदचे जिल्हा मिशन प्रबंधक नरेंद्र रहांगडाले व एमजीएनएफचे तेजस ठाकुर उपस्थित होते.

         श्री. पाटील पुढे म्हणाले, कौशल्य विकासाच्या माध्यमातून औरंगाबाद येथील प्रशिक्षण केंद्रात निवड झालेल्या संबंधीत महिलांनी पूर्ण केलेल्या प्रशिक्षणाचा लाभ घेऊन स्वयंरोजगार करुन आत्मनिर्भर व्हावे असे त्यांनी सांगितले.

         जिल्हाधिकारी यांचे पुढाकाराने गोंदिया जिल्ह्यात UNICEF व प्रथम एज्युकेशन फाउंडेशन यांचे संयुक्त विद्यमाने WASH (Water, Sanitation & Hygine) सेक्टर मधील OSSS (One Stop Shop n Service) हा प्रकल्प राबविण्यात आला. जेणेकरुन या महिलांना स्वयंरोजगार करण्याची सुवर्णसंधी प्राप्त होईल.

          या प्रशिक्षणामध्ये निवड झालेल्या 20 महिलांना PACE (Pratham Education Foundation) यांचे औरंगाबाद येथील प्रशिक्षण केंद्रात दिनांक 18 ते 30 नोव्हेंबर 2022 पर्यंत प्रशिक्षण देण्यात आले होते. या प्रशिक्षणामध्ये प्लम्बींग, इलेक्ट्रीशियन, पेन्टींग टायलींग, हाऊसकिपींग मॅनेजमेन्ट इत्यादी सेक्टरमध्ये प्रशिक्षण तसेच युनिसेफ कडून दहा हजाराचे टुल किट देण्यात आले.