पोलिस शिपाई संवर्गातील पदभरतीला २ जानेवारीपासून सुरुवात

0
22

गोंदिया- जिल्हा पोलीस आस्थापनेवरील रिक्त पोलीस शिपाई व पोलीस शिपाई चालक पदाची पोलीस भरती २ जानेवारी पासून सुरू होत आहे. महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवाप्रवेश नियमातील तरतूदी नुसार पोलीस अधीक्षक, जिल्हा-गोंदिया यांचे आस्थापनेवरील पोलीस शिपाई संवर्गातील १७२ रिक्त पदे, तसेच पोलीस शिपाई चालक संवर्गातील २२ असलेली रिक्त पदे भरली जाणार आहेत. सदर प्रक्रिया जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक बनकर यांच्या नेतृत्वात व मार्गदर्शना खाली. पोलीस मुख्यालय कारंजा येथे २ जानेवारीच्या सकाळी ५ वाजता पासून सुरवात होणार आहे.

या अंतर्गत पोलीस शिपाई चालक २२ पदाकरीता जिल्ह्यातील एकूण १0४१ अर्ज प्राप्त झालेले असुन पोलीस शिपाई संवर्गा तील रिक्त १७२ पदाकरीता जिल्ह्यातील एकूण १३६३५ अर्ज प्राप्त झालेले आहेत. भरती संदर्भात आवश्यक माहिती देण्यात आलेली असून यात प्रामुख्याने ज्या उमेदवारांना ज्या तारखेचे हॉल तिकीट प्राप्त झाले आहे त्यांना त्याच दिवशी प्रवेश देण्यात येईल. कुठल्याही कारणाने, कोणत्याही परिस्थतीमध्ये नंतर प्रवेश दिला जाणार नाही.
पोलीस भरती प्रक्रियेत उपस्थित राहणार्‍या ज्या महिला उमेदवार ३0™ (टक्के) आरक्षणाचा फायदा घेत आहेत त्यांचेकडे परिशिस्ठ फ हे १५ डिसेंबर २0२२ पयर्ंत चे किंवा त्यापूवीर्चे असणे आवश्यक आहे. पोलीस मुख्यालय कारंजा गोंदिया येथे सर्वप्रथम उमेदवारांची शारीरिक व मैदानी चाचणी प्रक्रिया घेण्यात येणार आहे. संपूर्ण पोलीस भरती प्रक्रिया अत्यंत पारदर्शकरित्या व्हिडिओ ग्राफी, सी.सी.टी.व्ही च्या निगराणी मध्ये पोलीस मुख्यालय, कारंजा येथील मैदानावर घेण्यात येणार असल्याने उमेदवारांची भरती प्रक्रियेस येताना आवश्यक साहित्य जसे-प्रवेशपत्र, शैक्षणिक कागदपत्रे, ओळखपत्र सोबत बाळगावे, अनावश्यक साहित्य सोबत बाळगू नयेत. पोलीस भरती प्रक्रियेच्या वेळी शारीरीक-मैदानी चाचणी दरम्यान उमेदवारास कोणतीही इजा अगर नुकसान झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी ही उमेदवाराची राहील, त्याकरीता उमेदवाराने स्वत:ची शाररिक क्षमता लक्षात घेवून मैदानी चाचणी सेवा प्रक्रियेत सहभागी व्हावे. संपूर्ण पोलीस भरती प्रक्रिया ही पोलीस मुख्यालय कारंजा येथील मैदानावर चोख पोलीस बंदोबस्तात पार पाडण्यात येणार आहे.
प्रक्रियेची सुरुवात सर्वप्रथम उमेदवारांच्या प्रवेशपत्र स्वीकारणे नंतर उंची, छाती वजन मोजमाप उंची, वजन, छाती मोजमाप यामध्ये पात्र उमेदवारांची शारीरीक मैदानी चाचणी घेण्यात येणार.
शारीरिक मैदानी प्रक्रिया पोलीस शिपाई संवर्गातील शिपाई पदाकरीता-पुरुष उमेदवार करीता – १00 मीटर धावणे, १६00 मीटर धावणे, व गोळा फेक महिला उमेदवार करीता – १00 मीटर धावणे, ८00 मीटर धावणे व गोळा फेक.
पोलीस शिपाई चालक संवर्गातील पदाकरीता :- पुरुष चालक उमेदवार – १६00 मीटर धावणे, गोळा फेक , व वाहन चालविण्याचे कौशल्य चाचणी (हलके मोटर व जिप प्रकारातील). महिला चालक उमेदवार – ८00 मीटर धावणे, गोळा फेक व वाहन चालविण्याचे कौशल्य (हलके मोटर व जिप प्रकारातील). अशाप्रकारे शारीरिक, व मैदानी चाचणी प्रक्रिया पार पडल्यानंतर यामधील पात्र उमेदवारांची पोलीस भरती सेवा प्रवेश नियमाप्रमाणे निवड यादी तयार करण्यात येवून लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. तदनंतर शारीरिक चाचणी व लेखी परीक्षेमध्ये प्राप्त केलेल्या गुणांच्या आधारे उमेदवारांची गुणवत्तेनुसार तात्पुरती निवड सूची तयार करण्यात येऊन तात्पुरत्या निवड सूचीमध्ये पात्र उमेदवारांची कागदपत्र पडताळणी केल्यानंतर पात्र ठरलेल्या उमेदवारांचाच निवड सूचीमध्ये समावेश केला जाईल.
गोंदिया जिल्हा पोलीस दलातर्फे जनतेला तसेच भरती करिता येणारे उमेदवार, उमेदवारांचे पालक यांना असे आवाहन करण्यात येते की, संपूर्ण पोलीस भरती प्रक्रिया ही पारदर्शक रित्या पार पाडण्यात येणार असल्याने पोलीस भरती प्रक्रिये दरम्यान कोणत्याही प्रकारच्या आमिषाला, प्रलोभनाला बळी पडू नये.