युवक-युवतींसाठी नि:शुल्क निवासी उद्योजकता विकास प्रशिक्षण

0
17

गोंदिया, दि.27 : महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र गोंदिया तसेच उद्योग संचालनालय मुंबई पुरस्कृत महाराष्ट्र व उद्योजकता  विकास केंद्र द्वारे आयोजित आणि महाराष्ट्र उद्योग, व्यापार व गुंतवणूक सुलभता कक्ष मुंबई यांच्या सहकार्याने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर अनुसूचित जाती/जमाती/ विशेष सामुहिक प्रोत्साहन योजनेअंतर्गत फक्त अनुसूचित जमातीच्या युवक-युवतींकरीता 18 दिवसीय निवासी उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम दिनांक 27 फेब्रुवारी ते 16 मार्च 2023 या कालावधीत प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे.

          या कार्यक्रमात उद्योजकीय व्यक्तीमत्व विकास, कारखाना भेटी, उद्योगाला लागणारे विविध नोंदणी व परवाने, स्टार्ट अप इंडिया, मुद्रा योजना, मेक इन इंडिया, यशस्वी उद्योजकांसमवेत चर्चा, उद्योग उभारणी, उद्योग निवड प्रक्रिया, बाजारपेठ सर्वेक्षण, प्रकल्प अहवाल, निधी उभारणी, स्टॅन्ड अप इंडिया, शासनाचे औद्योगिक धोरण, विविध क्षेत्रातील उद्योगसंधी (कृषी, सेवा, अन्न-खाद्य, केमिकल, प्लास्टिक), विविध कार्यालय व महामंडळाच्या कर्ज योजना, अभिप्रेरणा व व्यवस्थापन कौशल्य, विक्री व व्यवस्थापन कौशल्य, कंपनी नोंदणी प्रक्रिया, महिला उद्योजकांकरीता विशेष धोरण या विषयावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

          सदर कार्यक्रमाविषयी सविस्तर माहितीसाठी एमसीईडीचे प्रकल्प अधिकारी संदिप जाने (मो.8830015475, 9637536041) व कार्यालय सहाय्य्क शिशुपाल मानकर (मो.9130150017) यांचेशी संपर्क साधावा.