राज्यात तलाठी पदासाठी 4 हजार 625 जागांची मेगाभरती;सरकारने काढले आदेश

0
16

मुंबई – गेल्या अनके दिवसांपासून लक्ष लागून असलेल्या तलाठी पदाची मेगाभरती सरकराने अखेर जाहीर केली आहे.राज्यात तब्बल 4 हजार 625 जागांची तलाठी पदासाठी मेगाभरती केली जाणार आहे. सरकारने याबाबत आदेश देखील काढले आहेत.17 ऑगस्ट ते 12 सप्टेंबर दरम्यान ही मेगाभरती होणार असल्याचे आदेशात म्हटले आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणांना मोठा दिलासा मिळाला आहे.

महसूल व वन विभागाकडून आदेश काढण्यात आला असून, ज्यात महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाअंतर्गत तलाठी (गट-क) संवर्गातील एकूण 4 हजार 625 पदांच्या सरळसेवा भरती करता राज्यातील एकूण 36 जिल्ह्यात ऑनलाईन परीक्षा घेतली जाणार आहे. 17 ऑगस्ट ते 12 सप्टेंबर दरम्यान ही परीक्षा होणार असल्याचे आदेशात म्हटले आहेत.