तज्ञ वैद्यकीय अधिकारी पदांसाठी 14 जानेवारीला मुलाखती

0
29

गोंदिया : राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमासाठी जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटूंब कल्याण सोसायटी जि.प.गोंदिया अंतर्गत तज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांची कंत्राटी पध्दती पदभरती करावयाची आहे. यामध्ये बालरोग तज्ञ, नेत्ररोग तज्ञ, भुलतज्ञ व मानसोपचार तज्ञ याचा समावेश आहे. तरी 14 जानेवारी रोजी दुपारी 12 वाजता मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद गोंदिया येथे तज्ञ वैद्यकीय अधिकारी पदांच्या मुलाखतीसाठी उमेदवारांनी संपूर्ण आवश्यक मूळ दस्ताऐवजासह उपस्थित रहावे. विस्तृत माहिती जिल्हा परिषदेच्या www.zpgondia.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.श्याम निमगडे यांनी कळविले आहे.