Home Featured News #जमिनीशी आणि कर्तव्याशी नाळ जोडलेला प्रयोगशील शिक्षक

#जमिनीशी आणि कर्तव्याशी नाळ जोडलेला प्रयोगशील शिक्षक

0

वाढदिवस विशेष

“कर्मण्य वाधी कारस्ते मा फलेशु कदा चनः “
म्हणजे फळाची अपेक्षा न करता कर्म करत रहा परंतु व्यक्तिगत जीवनात अशी लोकं फारच कमी आढळतात त्या पैकी एक म्हणजे दिलीप वाघमारे आयुष्य कसे जगावे याचे उत्तर देताना गाडगे बाबा म्हणतात, की जो इतरांसाठी जगतो तो जगला. जो स्वतःसाठी जगला तो संपला. याचाच आदर्श घेत जिल्हा परिषद शाळा बाबरवस्ती (पांडोझरी ) जत जिल्हा सांगली येथील प्राथमिक शाळेतील शिक्षक दिलीप मारोती वाघमारे यांनी सामाजिक बांधिलकी जपत विद्यार्थी विकासाबरोबरच वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनाचे धडे आपल्या कर्तृत्वातून समाजमनापुढे आदर्श दाखवून दिला .दिलीप यांनी आपल्या कर्तृत्त्वाने ज्ञानदानासोबतच विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी होऊन आपल्या समाजाप्रती असणाऱ्या कामातून ठसा उमटविला आहे. वडिलांचे छत्र हरपल्याने सर्व जबाबदारी घेत त्यांच्या पुण्यदिनी ग्रंथालयास पुस्तके तसेच वृक्षलागवड गरीब व गरजू विद्यार्थ्यांना मोफत लेखन साहित्य दिले. यंदाच्या महात्मा फुले व विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्त रक्तदान करून एक आदर्श निर्माण केला. तसेच स्वतःच्या जन्म दिनानिमित्ताने इतर खर्च बाजूला ठेवून आसंगीतुर्क मॉडेल स्कुलसाठीही आर्थिक मदत केली आहे.

दिलीप वाघमारे यांना विविध तालुका स्तरीय, जिल्हास्तरीय तसेच राज्यस्तरीय पुरस्कार मिळालेले आहेत.कर्तृत्ववान व्यक्तीला आपल्या कार्याचा परिचय करून घ्यावा लागत नाही त्याचे कार्यच त्याच्या कर्तृत्वाची ओळख करून देतं. तशी आमची ओळख डी.एड ला मिरज येथील गोसलिया अध्यापक विद्यालयात असताना झाली. त्यात आम्ही होस्टेलला असताना रूम पार्टनर असल्यामुळे अतिशय जवळून एकमेकांशी संपर्कात आलो . जगात अतिशय जवळची आणि जिवाभावाची माणसं असू शकतात जरी रक्ताची नसली तरीही याची जाणीव दिलीप वाघमारे यांच्या सहवासात आल्यावर समजले . सुख दुःखात नेहमीच मी आहे अशी साद देणारा मित्र .एकाच दिवशीची नेमणूक आणि मला तासगाव तालुका तर दिलीप यांना जत तालुका मिळाला मला थोडं वाईट वाटलं कारण जवळ मिळालं असतं तर निदान सोबत राहता आलं असतं. तरी त्यातूनही कुठेही मिळालं तरी जाऊन काम करू नोकरी मिळाली त्याचं सोनं करू असं म्हणत ती खरं करूनही दाखवली.

आकाशात झेप घेण्यासाठी गरुडाचे पंख लावताही येतील पण गगनभरारीच वेड रक्तात असावं लागतं-
स्वतः शाळेची सर्व जबाबदारी घेऊन काही वर्षातच चार लाखांच्यावर शैक्षणिक निधी शाळेला मिळवून दिला. व दुष्काळात ही वृक्षारोपण करून शाळा परीसर हिरवगार केला व शाळेला जत तालुक्यातील पहिली द्विशिक्षकी आय.एस.ओ.मानांकित शाळा हा बहुमान मिळून देऊन सर्वांना आश्चर्याचा धक्का तुम्ही दिला. लोकांशी व पालकांशी संपर्क ठेवून विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता व प्रगती करून बाबरवस्ती शाळा नावावरूपास आणली. जत तालुका म्हणजे भयानक दुष्काळ ओसाड माळरान अशा निरस वातावरणात, अवती भोवती शेळ्या मेंढ्याचा वावर असूनही आपण या दुष्काळातही ज्ञानाचं नंदनवन फुलवले.
जिद्दी, परिश्रमी आणि हुशार शिक्षक असले तर राज्याच्या नकाशावर गुणवत्ता सिद्ध झाली म्हणून समजा. बाबवरवस्तीची जिल्हा परिषद शाळा कोणत्याही इंग्रजी किंवा खासगी प्रशासनाची शाळा नाही ही आहे एका ध्येयवेड्या गुरुजींची नकाश्यावरची शाळा आहे.आपल्या शाळेच्या नवोपक्रमाची दखल महाराष्ट्र शासन शिक्षण विभाग यांनी घेऊन मूल्यवर्धन यशोगाथा मध्ये आपण आपल्या बाबरवस्ती शाळेचे नाव कोरलं तुमचं कार्य फक्त शाळा केंद्र तालुका जिल्हा इत्यादीपर्यंत मर्यादित न ठेवता ते राज्य पातळीवर पोहचवला असंच हे नाव देश पातळीवर पोहवाल अशी अपेक्षा व सदिच्छा या शाळेला महाराष्ट्रात झाडाखालची शाळा असं नाव लौकिक मिळालं आहे.

केवळ तुमच्यामुळे हे शक्य झाले…
बौद्धीक शिक्षणाचा प्रभाव विचारशक्तीवर तर मूल्य शिक्षणाचा प्रभाव विद्यार्थ्यांच्या हृदयावरती पाडणारे,आपल्या मौलिक अशा शैक्षणिक शैलीतून विध्यार्थ्यांना धारदार करणारे, सामाजिक, शैक्षणिक कार्यात अग्रेसर असलेले दैनिक रयतेचा वाली जिल्हा प्रतिनिधी व शिक्षक ध्येयचे उपसंपादक, उपक्रमशील व ध्येयवेड्या गुरुजीं, अनेक आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त करणारे व छत्रपती शिवाजी महाराज, फुले,शाहू, आंबेडकर यांच्या विचारांचा सच्चा अनुयायी दिलीप मारोती वाघमारे यांना वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा

लेखक- विशाल रंजना विष्णू खाडे (केंद्र प्रमुख कवठेएकंद) ( कवलापूर )सांगली ९६३७८५३५१५

error: Content is protected !!
Exit mobile version