नवनिर्माण फाऊंडेशनचा राज्यस्तरीय ’यादें रफी गीत स्पर्धेला’ रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

0
13

वाशिम : गायक स्व. मोहम्मद रफी यांच्या जयंतीनिमित्त शनिवार दि. 24 डिसेंबर 2022 रोजी स्थानिक स्वागत लॉन, मन्नासिंह चौक, वाशिम येथे नवनिर्माण फाऊंडेशन, वाशीम तर्फे  आयोजित राज्यस्तरीय यादें रफी गीत स्पर्धा उत्साहात पार पडली. स्पर्धेत संपूर्ण महाराष्ट्र भरातील  स्पर्धकांनी सहभागी होवून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संजय आधारवाडे तर कार्यक्रमाचे उद्घाटक जेष्ठ समाजसेवक वसंतरावजी धाडवे  हे लाभले होते.  सर्व प्रथम प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दिपप्रज्वलन व सरस्वती पुजन करण्यात आले. स्पर्धेकरीता परीक्षक म्हणून अमरावतीचे डॉ. गजानन केतकर तसेच श्रीमती रोशनी दर्जी, अमरावती यांनी उत्कृष्ट परिक्षकाची भूमिका पार पाडली.
स्पर्धेची सुरवात नवनिर्माण फाऊंडेशचे अध्यक्ष श्री श्याम बढेल व सर्व सदस्यांनी मिळून श्री श्री रविशंकर यांचे जय गुरू ओंकारा हे भजन गावून कार्यक्रमात आध्यात्मिक व भक्तिमय वातावरणाची निर्मिती करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. स्पर्धेमध्ये जाने वालों जरा मुडके, दिल का सुना साज, सलोना सा सजन है, सत्यम शिवम सुंदरम, घर मोर परदेसी आ, मोरनी बागामा बोले, कुहु कहु बोले कोयलिया, अजहुना आये बालमा, ये रेशमी जुल्फे असे अनेक दर्जेदार गीतांना प्रेक्षकांनी प्रचंड टाळ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
पुरूष गटातून स्पर्धेचे पहिले पारितोषिक 15001 रु. श्री दिनेश धंजे अकोला, दुसरे पारितोषिक 11001 रू. श्री सुमेध मोरे औरंगाबाद, तिसरे पारितोषिक 7001 रू. श्री रोमहर्ष बुज़ुक अमरावती यांनी पटकाविले. महिला गटातून पहिले पारितोषिक 15001 रू. सानिका बोभाटे वर्धा, दुसरे पारितोषिक 11001 रू. लाजरी भुरे नागपूर, तिसरे पारितोषिक 7001 रू. सोनल पुरोहित खामगांव यांनी मिळविले. तर विशेष ज्युरी पुरस्कार 5001 रु. वंदना बोनकिले यवतमाळ तर श्रोते प्रोत्साहनपर बक्षिस (ऑन पब्लिक डिमांड) 5001 रु. सौ. वर्षा बाठे अकोला, बेस्ट क्लासिकल पुरस्कार 5001/- रू. प्रिती पाठक वाशिम, लता मंगेशकर स्मृति पुरस्कार 5001/- रू. वैष्णवी निंभोरकर अमरावती यांना प्रदान करण्यात आले. तसेच वाशिमच्या स्थानिक कलाकारांमधून व्हाईस ऑफ वाशीम पुरूष पारितोषिक 5001 रू. श्री महेश बारटक्के वाशिम, तर व्हाईस ऑफ वाशीम महिला पुरस्कार 5001/ – रू. आदिती काटेकर वाशिम यांना देण्यात आला. तसेच दिव्यांग स्पर्धकामधून प्रथम पुरस्कार 8001/- रू. सौ. पुजा शेंद्रे नाशिक, द्वितीय पुरस्कार 7001/- रू. प्रविण कठाळे पुसद, तृतीय पुरस्कार 6001/- श्री आकाश अंबुढारे पुसद, चतुर्थ पुरस्कार 4001/- रू. यश गायकवाड पुसद यांना देण्यात आले. या कार्यक्रमात बालगटात प्रथम पारितोषिक 7001/- रू. कु. स्वरा लाड, यवतमाळ तर व्दितीय पारितोषिक 6001/- रू. कु. राजश्री ठेंगळे मालेगांव व तृतीय पारितोषिक 5001/- रू. अंजली पुरोहित कु. खामगांव यांना प्रदान करण्यात आले. या पारितोषिक सोबत प्रमाणपत्र व विशेष शिल्ड देण्यात आले. तसेच स्पर्धेत भाग घेणार्‍या सर्व स्पर्धकांना संस्थेतर्फे प्रमाणपत्र देण्यात आले. व या स्पर्धेत सहभागी झालेल्या दोन्ही परीक्षकांना मानपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. तसेच वाद्यवृंदांची उत्कृष्ट भूमिका मेलोडी मेकर्स ग्रुप अमरावती (रामेश्वर काळे) यांनी पार पाडली. कार्यक्रमाचे बक्षिस वितरण हुकूम तुर्के,  वसंतराव धाडवे, मिठुभाऊ शर्मा, राहुल तुपसांडे, संतोष वानखेडे, रवि भांदुर्गे, साहब नारंग, विश्वास ब्रम्हेकर,  नितीन बगाडे, गजानन ठेंगडे, प्रशांत भडके, कपिल सारडा, सावन ठाकुर व वाशिमचे इतर गनमान्य प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते झाले.
याप्रसंगी पोलिस प्रशासन व कपिल सारडा यांच्या नियंत्रणात असलेली प्रायव्हेट सिक्युरिटी यांनी कडक बंदोबस्त देऊन कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता अत्यंत मोलाचे सहकार्य केले. तसेच अनिल केंदळे (एम.एल. कंन्स्टक्शन) व डॉ. हरिषजी बाहेती तसेच साहब नारंग यांनी कार्यक्रमात आलेल्या सर्व स्पर्धकांसाठी तसेच आमंत्रित पाहुण्यांसाठी जेवणाची व्यवस्था केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अविनाश मारशेटवार यांनी केले. तर संचालन व आभार प्रदर्शन संस्थेचे अध्यक्ष श्याम बढेल यांनी केले. तसेच कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता नवनिर्माण फाऊं डेशनचे संस्थेचे अध्यक्ष श्याम बढेल, मनोहर महेंद्र मानतकर, महादेव हरकळ, लक्ष्मण बढेल, एन. जी. मसरे, जितु बढेल, मनोज बढेल, तोताराम बढेल, रूपेश बढेल, गंडागळे, ऍड. सुरेश टेकाळे, पवन शर्मा, सौ. सोनाली गावंडे, सौ. ज्योती इंगळे, अश्विनी अवताडे, टेकाळे मॅडम व समस्त नवनिर्माण फाऊंडेशन गृपने अथक परिश्रम घेतले.