माजी विद्यार्थ्यांनी रचला एक अनोखा उपक्रम

0
13

गोंदिया,दि.05ः- जिल्हा परिषद हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज आमगाव येथील 1993 साली 12 वा वर्ग पास झालेले सर्व विद्यार्थी तब्बल 29 वर्षानंतर एकत्र आले व ख्रिसमस च्या दिवशी दिनांक 25 डिसेंबर 2022 रोजी वेगवेगळ्या ठिकाणाहून सर्व एकत्र झाले. गोंदियाच्या जवळ असलेला पांगळी येथील वनस्थली येथे एकत्र येण्याच्या उपक्रम यशस्वी ठरला व इतक्या कालावधीनंतर सर्व मित्र एकमेकांना बघून अतिशय आनंदी झाले. यामध्ये काही मित्र एकमेकांना ओळखत नव्हते एकमेकांच्या चेहऱ्याकडे बघून आश्चर्य व्यक्त करू लागले सर्व मित्रांनी यावेळी आपला सविस्तर स्थायी पत्ता कुठे राहतात व व्यवसाय किंवा नोकरी कुठे सुरू आहे याबद्दल सविस्तर माहिती दिली तसेच आपल्या परिवारातील सदस्यात बाबत सर्व मित्रांना सांगितले.काहींनी आपले या 29 वर्षाच्या कालावधीमध्ये आलेले चांगले वाईट अनुभव सुद्धा एकमेकांना शेअर केले ज्यांच्यामुळे त्यांच्या जुन्या आठवणी ताज्या झाल्यात.

या मित्र मिलन समारंभामध्ये मनीष तिवारी, भगवती अग्रवाल, राध्येश्याम शरनागत, विनोद चौधरी, गोपाल अग्रवाल, राकेश गौतम, मुकेश कटरे, राजू सूर्यवंशी, मनीषा वाघमारे(फुलझेले), मीना पटले(कटरे), सुधा मोदी, आशिष असाटी, व खुमेन्द्र कटरे उपस्थित होते.
हा अनोखा उपक्रम घडविण्यासाठी मनीष तिवारी, राधे शरणागत, भगवती अग्रवाल, राजु सूर्यवंशी व सुधा मोदी यांनी प्रत्येकाशी वैयक्तिकरित्या संपर्क करून सर्व मित्रांना एकत्रित येण्याची अपील केली व सर्व मित्र एकत्रित झाले. या अनोख्या मित्र मिलन समारंभामध्ये जे मित्र उपस्थित राहू शकले नाही त्यांनी याबद्दल मोबाईलवर संपर्क करून आपल्या गैरहजेरी बाबत खेद व्यक्त केला व यापुढे असे कार्यक्रम आयोजित झाल्यास आम्ही सर्व नक्कीच उपस्थित राहू असे अशा व्यक्त केली.