Home Featured News पिपरीयाच्या सशस्त्र दूरक्षेत्रातील पोलीस अमंलदारांनी दिलाय वृध्दांना आधार

पिपरीयाच्या सशस्त्र दूरक्षेत्रातील पोलीस अमंलदारांनी दिलाय वृध्दांना आधार

0

गोंदिया,दि.28ः-सालेकसा पोलीस ठाणे अंतर्गत येत असलेल्या सशस्त्र दूरक्षेत्र पिपरीया येथील पोलीस अमंलदारांनी पिपरीया येथील वृध्द भाऊ बहिणींचे संगोपन करुन आधार दिल्याने त्यांच्या या कार्याची सर्वत्र प्रशंसा केली जात आहे. सविस्तर असे की, पिपरिया येथील रहिवासी अमरू जागो उईके वय ८५ व त्यांची बहीन श्रीमती येमीबाई चत्रु मडावी वय ८२ रा. पिपरीया यांचे कुणीही नातेवाईक नसल्याने त्यांना म्हातारपणात खूप त्रास सहन करावा लागला.ते वृद्ध असल्याने शेजाऱ्यांनीही त्यांच्याकडे पाठ फिरविल्याची माहिती मिळताच पिपरिया येथील पोलीस अंमलदार यांनी समाजातील रंजले गांजल्यांची सेवा करण्या़चा वसा हाती घेत या वृद्धांना आधार दिला.कुटुंबातील एक सदस्य म्हणूनच गेल्या दोन वर्षांपासून त्यांची काळजी घेत असून त्यांच्या दैनंदिन गरजा भागवत आहेत.

या वृद्ध भाऊ बहिणींला दोन्ही वेळचे अन्न सशस्त्र दूरक्षेत्र पिपरिया येथून पुरवठा केला जात आहे.आवश्यक गरजा जसे साबण, कापड , केसांचे तेल, धुण्याचा सोडा, मिठाई, साखर आणि चहा.कपडे, चादरी, उबदार कपडे, ब्लँकेट आणि वर्षभर वापरण्या साठी लागणारे इतर आवश्यक कपडेही पुरविण्यात येत आहेत.त्यांना आवश्यक वैद्यकीय सेवा आणि आवश्यक औषधे देखील पुरविली जात असून दैनंदिन खर्चासाठी आवश्यक आर्थिक मदत केली जात आहे.वयोवृद्धभाऊ बहिणीला, शासनाच्या योजनेचा फायदा काय किंवा श्रावणबाळ आणि संजय गांधी यांच्या निराधार योजनेसाठी एओपीच्या माध्यमातून खूप प्रयत्न करण्यात आ़ले.परंतु कागदपत्रामधील त्रुटींमुळे ते यशस्वी होऊ शकले नाही.सदर वयोवृद्धांचे घर मातीचे असल्‍याने व पावसाळ्यात गळत असल्याने पोलीस अंमलदारांनी वरिष्ठांच्या माध्‍यमातून आदिवासी विभागाचे प्रकल्‍प अधिकारीशी बोलून त्‍यांच्‍या माध्‍यमातून काहीतरी मदत करण्‍याची विनंती केल्यावर त्‍यांच्‍या घर दुरुस्तीचे आश्‍वासन दिले आहे.सशस्त्र दूरशेत्र पिपरिया येथील मदत करणाऱ्या सर्व पोलीस अंमलदारांनी केलेल्या उल्लेखनीय कामाचे कौतुक आणि अभिनंदन केले जात आहे

Exit mobile version