कमलापुरातील हत्ती कॅम्पमध्ये जागतिक हत्ती दिवस

0
5

गडचिरोली : राज्यातील एकमेव हत्ती कॅम्प असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील कमलापूरच्या हत्ती कॅम्पमध्ये शनिवारी जागतिक हत्ती दिवस साजरा करण्यात आला. यानिमित्त तेथील आठ हत्तींना केळी, टरबुज, नारळांसह इतर गोड पदार्थांची मेजवानी देण्यात आली.

अहेरी तालुक्यातील कमलापूर येथे असलेल्या वनविभागाच्या या हत्ती कॅम्पमध्ये एकूण आठ हत्ती आहेत. त्यात अजित आणि गणेश या नर हत्तींसह मंगला, रूपा, बसंती, राणी, प्रियंका आणि लक्ष्मी या मादी हत्तींचा समावेश आहे.

उपवनसंरक्षक पूनम पाटे, उपविभागीय वनाधिकारी वरुण कुमार, वनपरिक्षेत्राधिकारी विकास भोयर, वन्यजीव पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.महेश येमचे आणि इतर वन कर्मचारी यावेळी उपस्थित होते. त्यांनी आपल्या हातांनी हत्तींना केळी भरविल्या.