Home Featured News कोण आहेत रघुबर दास?

कोण आहेत रघुबर दास?

0

रघुबर दास हे कॉलेज जीवनापासूनच राजकारणात सक्रिय आहेत. टाटा स्टीलमध्ये कामगार म्हणून त्यांनी आपल्या कामाची सुरूवात केली. मात्र समाजसेवेची आवड असणाऱ्या रघुबर दास यांनी अनेक समाजोपयोगी काम करत त्यांनी झारखंडच्या उपमुख्यमंत्रीपद खुर्ची गाठली. आता ते झारखंडचे मुख्यमंत्री होणार आहेत.

दास यांचा जन्म अतिशय सामान्य कुटुंबात झाला आहे. त्यांचे मूळ गाव छत्तीसगडमधील बोधी पात्री हे असून जमशेदपूरमधील भालू वासा येथे त्यांचं कुटुंब आहे. रघुबर दास यांचे वडील चमन राम हे टाटा स्टील कंपनीमध्ये लोको ट्रेनमध्ये मजूर म्हणून काम करत होते.

दास यांचे शिक्षण जमशेदपूरमध्ये झाले आहे. त्यांनी बीएससी को ऑपरेटिव्ह कॉलेज जमशेदपूर येथून 1980 साली आपले शिक्षण पूर्ण केले. 11 मार्च 1978 रोजी त्यांचा विवाह झाला. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे.

रघुबर दास हे दोन वेळा झारखंडचे भाजप अध्यक्ष राहिले आहेत. विद्यार्थी जीवनात ते विद्यार्थी संघर्ष समितीचे सक्रिय कार्यकर्ते राहिले तसंच जमशेदपूर विद्यापीठासाठी त्यांनी मोठा संघर्ष उभारला होता. याशिवाय जमशेदपूरमध्ये त्यांनी जयप्रकाश नारायण आंदोलनाचे नेतृत्व केले आहे. त्यानंतर 1976-77 साली त्यांनी आपल्या जनता पार्टीद्वारे राजकीय कारकिर्दीला सुरूवात केली.

रघुबर दास हे भाजपच्या स्थापनेपासून म्हणजेच 1980 सालापासून ते पक्षात सक्रीय आहेत. याशिवाय त्यांनी झारखंड भाजपचे शाखाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष तसंच झारखंडचे महामंत्री, उपाध्यक्ष आदी पदं भुषवली आहेत.

रघुबर दास यांची राजकीय कारकिर्द-
दास 2000 साली झारखंड सरकारमधील श्रम नियोजन आणि प्रशिक्षण मंत्री झाले.
2003 मध्ये भवन निर्माण मंत्री आणि 2005 मध्ये वित्त, वाणिज्य आणि नगरविसास मंत्री म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे.
दास यांचं संघटन कौशल्य पाहून पक्षाने 2004 साली त्यांची झारखंडच्या प्रदेशाध्यपदी निवड केली.
2009 साली शिबू सोरेन यांच्या सरकारमध्ये रघुबर दास यांना उपमुख्यमंत्री बनविण्यात आले.
2009 साली त्यांना पुन्हा एकदा भाजपचं प्रदेशाध्यक्ष बनविण्यात आलं.
1995 साली दास यांनी काँग्रेसच्या के पी सिंह यांचा 1101 मतांनी पराभव केला. त्यानंतर मात्र ते सलग पाचवेळा आमदार म्हणून निवडून येत आहेत.

Exit mobile version