Home Featured News धर्म रक्षणासाठी संतांनाही शस्त्र हाती घ्यावे लागेल

धर्म रक्षणासाठी संतांनाही शस्त्र हाती घ्यावे लागेल

0

गोंदिया : हिंदू धर्म सनातन काळापासून अस्तित्वात आहे. परंतु या धर्मावर हजारो वर्षापासून आघात होत आहे. आजपर्यंत हिंदूस्थानावर अनेक धर्माचे आक्रमण झाले. मात्र हिंदूंच्या सहिष्णुतेमुळे आज भारतात अनेक धर्म अस्तित्वात आहेत. आजही काही धर्मांचे हिंदूविरोधी कारस्थान सुरूच आहे. याचा विरोध करण्याचे आवाहन करीत धर्म रक्षणासाठी प्रसंगी संतांनाही हाती शस्त्र घ्यावे लागेल, आणि त्यासाठी आम्ही तयार आहोत, असे आवाहन साध्वी बालिका सरस्वती यांनी केले.
येथील सर्कस मैदानावर गुरूवारी झालेल्या विराज हिंदू संमेलनात त्या बोलत होत्या.
विश्‍व हिंदू परिषदेच्या सुवर्ण जयंती वर्षानिमित्त या संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी छत्तीसगडचे गौरक्षा प्रमुख संत बाल योगेश्‍वर रामबालकदासजी महाराज, संत यशेश्‍वरानंद महाराज, संत टेकाम महाराज धानुटोला, विहिंपचे क्षेत्रीय संघटनमंत्री बी.सी.भरतीया, विहींपेच प्रांत अध्यक्ष विजयसिंह वालिया, बजरंग दलाचे प्रांत अद्यक्ष देवेश मिश्रा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भंडारा विभागाचे संघचालक दिनेश पटेल, गोंदिया जिल्हा संघचालक फनिंद्रनाथ बिसेन, वर्षाताई महात्मे, तसेच विहिंप, बजरंग दल व दुर्गा वाहिनीचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी साध्वी सरस्वती म्हणाल्या, हिंदू धर्मात नारीला सन्मानाचे स्थान आहे.
परंतू देशात नारीची सुरक्षितता धोक्यात आली आहे. लव जिहादच्या नावाखाली हिंदू मुलींना बाटविण्याचे काम सुरू आहे.
यावेळी रामबालकदासजी महाराजांनी गौहत्या बंदी झालीच पाहीजे यावर जोर देताना ठिकठिकाणचे कत्तलखाने बंद करण्यासाठी नागरिकांनी पुढे येण्याचे आवाहन केले.

error: Content is protected !!
Exit mobile version