Home Featured News राज्यपालांच्या दत्तक भामरागडला विकासाची प्रतीक्षा

राज्यपालांच्या दत्तक भामरागडला विकासाची प्रतीक्षा

0

भामरागड : महाराष्ट्राच्या राज्यपालांनी दत्तक घेतलेल्या भामरागड तालुक्याला अद्यापही विकासाची प्रतीक्षा करावी लागत आहे. भामरागड या मागास तालुक्यात अनेक समस्या गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. त्यामुळे राज्यपालांनी दत्तक घेतलेल्या शब्दाला काहीही किंमत उरलेली नाही, असा परखड आरोप अहेरी जिल्हा निर्माण कृती समितीचे अध्यक्ष रघुनाथ तलांडे यांनी केला आहे.

अहेरी उपविभागातील भामरागड तालुका राज्यपालांनी दत्तक घेतला आहे. दत्तक घेण्याचा हेतू साध्य होईल. जेव्हा तालुक्याचा सर्वांगिण विकास होईल. मात्र अजुनही भामरागड तालुक्यात कोणताही विकासात्मक बदल झालेला नाही. भामरागड तालुक्यातील जनतेच्या दृष्टीने पर्लकोटा नदीचा पूल होणे गरजेचे आहे. पावसाळ्यात अनेकदा याच पुलामुळे तालुक्याचा संपर्क खंडीत होतो. भामरागड तालुक्यात विजेची तसेच वाहतुकीची समस्याही बिकट आहे. या तालुक्यात लिफ्ट एरिकेशन प्रकल्प करून या तालुक्यातील शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. ताडगाव, मन्नेराजाराम रस्त्याचे बांधकाम, भामरागड-आलापल्ली रस्त्याचे बांधकाम, ताडगाव-एटापल्लीला जोडणारा रस्ता, बांडीया नदीवरील पुलाचे बांधकाम, भामरागड येथे मिनी बसस्टँड स्थापण करणे, ताडगाव येथे निर्माणाधिन राजस्व मंडळ कार्यालयाचे बांधकाम पूर्ण करणे, लाहेरी, कोठी, ताडगाव येथे दूरध्वनी टॉवर उभारणे, बामणीपल्ली, येचली, जिजगाव, कोठी, आरेवाडा येथे पाणी पुरवठा योजना उभारणे, बांबू हस्तकला उद्योग स्थापन करणे, गैरआदिवासींना तीन पिढ्यांची अट रद्द करून वनहक्क पट्टे देणे, अनेक गावात विद्युत जोडणीचे काम पूर्ण करणे, तलावाचे बांधकाम करणे, बिनागुंडा पर्यटन स्थळाचा विकास करणे, तसेच तालुक्यातील शासकीय कार्यालयात रिक्त असलेल्या जागा भरणे आदी समस्या शासनाने सोडवाव्या, अशी मागणी राज्यपालांना पाठविलेल्या निवेदनातून केली.

Exit mobile version