राज्यातील पहिले, तर देशातील तिसरे रेल्वे स्थानक
गोंदिया,- प्रवाशांना अत्यधीक सुविधा पुरविण्याच्या दृष्टीने येथील रेल्वे स्थानक प्रशासनाने सुरवात केली. जिल्ह्यातील पारा उन्हाळ्यात ४७ अंशापर्यंत जातो. त्यामुळे प्रवाशांच्या अंगाची लाहीलाही होते. त्यापासून त्यांना मुक्ती िमळावी, याकरिता ५० लाख रुपयांच्या कुंलीग सिस्टम ला मंजूरी प्रदान करण्यात आली. बुधवार पासून ही प्रणाली सुरू करण्यात आली. या माध्यमातून ४७ अंशावरील तापमान २५ ते ३० अंशापर्यंत आणण्यात येणार आहे. प्रणालीचे उद्घाटन खासदार नाना पटोले यांच्या हस्ते, डीआरएम आलोक कंसल,जिल्हाधिाकरी डॉ.अमित सैनी यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
गोंदिया रेल्वे स्थानक अ श्रेणीमध्ये आहे. वर्षाकाठी सहा कोटी रुपयांपर्यंत या स्थानकावरून मिळणारा महसूल आहे. मध्यवर्ती आणि महत्वाचे स्थानक असल्याचा बहुमान देखील या स्थानकाला आहे. दिवसाकाठी येथून मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि चंद्रपूरच्या दिशेने धावणाèया गाड्यांतून हजारो प्रवासी प्रवास करताता. प्रवाशांना अत्यधीक सुविधा पुरविण्याकरिता रेल्वे प्रशासनाचे प्रयत्न सातत्याने सुरू आहेत. गेल्या दोन वर्षांपासून स्थानकाच्या सौंदर्यीकरणात भर पडली. ङ्कलाटांत वाढ करण्यात आली. आता उन्हाळ्यात प्रवाशांचे उष्णतेपासून हाल होऊ नये, याकरिता ५० लाख रुपयांतून ‘कुलीग सिस्टम सुरू करण्यात आले. प्रत्येक फलाटावर असलेले पंख्यांना थंड पाण्याचे पाइप जोडण्यात आले. पंखे सुरू झाल्यानंतर ङ्कलाटावर गाडी येण्याच्या अर्धा तास पूर्वी पासून पाणी सोडण्यात येणार आहे. त्यामुळे कुलर किंवा एसीस‘ोर बसल्याचा आणि थंड हवा प्रवाशांना फ्लाट आणि तिकीट घरात मिळणार आहे. त्याकरिता पाणी शुद्धीकरण यंत्र देखील बसविण्यात आले.
जिल्ह्यात मे ते जून महिन्यात जिल्ह्यातील उष्णतेचा पारा ४७ अंशापर्यंत पोहोचतो. या प्रणालीमुळे ४७ अंशांवरील तापमान २५ अंशांपर्यंत आणला जाणार आहे. त्याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. संपूर्ण देशात अशाप्रकारचे प्रयोग रेल्वेच्ङ्मा बिलासपूर झोनमध्ङ्मेच पहिल्ङ्मांदा करण्ङ्मात आला आहे. यापुर्वी बिलासपूर आणि रायपूर येथील स्थानकांवर ही सुविधा करण्यात आली परंतु ती ङ्कक्त एका प्लेटफामर् पुरतीच होती परंतु गोंदिया सर्वच ६ प्लटफामर्वर ही सुविधा उपलब्ध करुन देण्ङ्मात आली असून गोंदिया रेल्वेस्थानक हा देशातील तिसरा आणि राज्यातील पहिला ठरला आहे.यासाठी लागणारा वाटर फिल्टर प्लांट सुध्दा प्लांट परिसरातच लावण्ङ्मात आला असून शुध्द पाण्ङ्माचा वापर होणार आहे.रेल्वेस्थानकावर गाडी येण्याच्या अर्धातास आधी ही सेवा सुरु करण्यात येणार असल्याचे कंसल यांनी सांगितले. यानंतर अनेक योजनांच्या माध्यमातून गोंदिया स्थानकाला ‘हायफाय करण्याचा मानस असल्याचा आशावाद खासदार नाना पटोले यांनी व्यक्त केला. होम प्लेटफामर्वरून नागपूरगडे जाणाèया सोडण्याकरिता अतिरिक्त लाइन तयार करण्यासाठी पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला.येत्या सहा महिन्ङ्मात या प्लटफामवरुन नागपूर,मुंबईकरीता गाडी सोडण्ङ्माचे आश्वासन डीआरएम यानी दिले.