Home Featured News पेट्रोल- डिझेल १.५० रुपयांनी महागले

पेट्रोल- डिझेल १.५० रुपयांनी महागले

0

नवी दिल्ली- उत्पादन शुल्कात सरकारने गुरुवारी वाढ केल्याने पेट्रोल- डिझेलचे दर १.५० रुपयांनी महागले आहेत. यामुळे केंद्र सरकारच्या तिजोरीत १३ हजार कोटींची भर पडणार असली तरी महागाई वाढण्याची मात्र दाट शक्यता आहे.
आंतरराष्ट्रीय तेल बाजारात तेलांच्या किंमतीत घट झाल्याने ऑगस्टपासून पेट्रोलच्या किमतीमध्ये सहावेळा आणि डिझेलच्या दरात महिनाभरात दोनदा कपात करण्यात आली. येत्या शनिवारच्या बैठकीतही दर कमी होण्याचे संकेत तेल कंपन्यांनी दिले होते. मात्र आता सरकारने उत्पादन शुल्कात वाढ केल्याने पेट्रोल- डिझेलचे दर कमी होण्याची शक्यता कमी आहे.
पेट्रोलवर असणारे उत्पादन शुल्क १.२० रुपयावरुन ते आता २.७० रुपये प्रतिलिटर केले आहे. तर डिझेलवरील उत्पादन शुल्क १.४६ रुपयावरुन ते आता २.९६ रुपये प्रतिलिटर केले आहे.
ब्रांडेड पेट्रोलवर असणारे उत्पादन शुल्क २.३५ रुपयावरुन ते आता ३.८६ रुपये प्रतिलिटर केले आहे. तर ब्रांडेड डिझेलवरील उत्पादन शुल्क ३.७५ रुपयावरुन ते आता ५.२५ रुपये प्रतिलिटर केले आहे.
दरम्यान, आंतरराष्ट्रीय तेलाच्या किंमतीत घट झाल्याने यापूर्वी एक नोव्हेंबर रोजी पेट्रोल २.४१ तर डिझेल २.२५ रुपयांनी स्वस्त झाले. ऑगस्टपासून पेट्रोलच्या दरात प्रति लीटर ९.३६ रुपये कपात झाली आहे. डिझेलच्या किमतीत पाच वर्षात पहिल्यांदाच १९ ऑक्टोबर रोजी प्रति लीटर ३.३७ रुपयांनी कपात करण्यात आली. तर पुन्हा एक नोव्हेंबर रोजी डिझेल प्रति लीटर २.२५ रुपयांनी स्वस्त झाले.

error: Content is protected !!
Exit mobile version