*तिरोडा* :- पोवारी बोली, मराठी तथा हिंदी चे सुप्रसिद्ध कवी एड.देवेंद्र चौधरी, तिरोडा यांना त्यांच्या पोवारी बोलीतील कवितासंग्रह “पेंडी” याची निवड ‘स्व.सौ.कमलाबाई कटरे साहित्य पुरस्कार-2024’ यासाठी करण्यात आलेली आहे. सदर पुरस्कार मई-2025 मध्ये आयोजित एका सन्मान समारोहात त्यांना प्रदान करण्यात येणार आहे.
हे विशेष की, “आधारक सर्वांगीण समाजविकास बहुद्देशीय संस्था, बोरकन्हार (र.नं.महा/754/04),” *जि.गोंदिया द्वारा पोवारी बोली, मराठी तथा हिंदी चे सुप्रसिद्ध कवी एड.देवेंद्र चौधरी, तिरोडा यांना त्यांच्या आजवर च्या साहित्य क्षेत्रातील कामगिरी बघून आणि विशेष म्हणजे पोवारी बोली साठी करीत असलेल्या त्यांच्या कार्याबद्दल हे साहित्य पुरस्कार घोषित करण्यात आलेले आहे. कवी अँड. देवेंद्र चौधरी यांनी पोवारी बोलीत नवीन स्वयंनिर्मित काव्यप्रकार निर्माण केले आहेत. त्यांच्या “पेंडी” हा काव्यसंग्रह अमेझॉन, फिल्पकार्ड वर देखील उपलब्ध आहे. दिल्ली येथील प्रकाशनाने प्रकाशित केलेला आहे. कवी अँड. देवेंद्र चौधरी यांच्या पोवारी बोली, हिन्दी आणि मराठी भाषेत एकूण 5 पुस्तक प्रकाशित झालेल्या आहेत. त्यांना आजपर्यंत त्यांच्या साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल अनेक आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय स्तरावर, राज्यस्तरावर अनेकदा पुरस्काराने व सन्मानाने सन्मानित करण्यात आले आहे. मागील वर्षी नेपाळ देशामध्ये आयोजित विश्व प्रतिभा आंतरराष्ट्रीय सन्मान समारोह मध्ये सन्मानीत करण्यात आले आहे. कवी अँड. देवेंद्र चौधरी यांनी मध्यप्रदेश मधील पांढुरना येथील अखिल भारतीय तिसरे पोवारी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद देखील भूषविले असून सदर सन्मान, पुरस्कार हा त्यांच्या साहित्याच्या कारकीर्दीत भर टाकणारा आहे. तसेच ते नागपूर आकाशवाणी केंद्रातून देखील त्यांचा काव्यपाठ प्रस्तूत झालेला आहे. त्यांना त्यांच्या मिळालेल्या सन्मानाबद्दल वकील संघ, तिरोडा, जिल्ह्यातील पोवार समाज बांधव व मित्र परिवाराने त्यांचे कौतुक केले आहे.
Home हिंदी खबरे कवी अँड. देवेंद्र चौधरी यांना “आधारक सर्वांगीण समाजविकास बहुद्देशीय संस्था, बोरकन्हार” द्वारा...